जागतिक युवा तंबाखू सर्वेक्षण, (GYTS-४) इंडिया २०१९ राष्ट्रीय फॅक्टशीटचे अनावरण तंबाखूसेवन

जागतिक युवा तंबाखू सर्वेक्षण, (GYTS-४) इंडिया २०१९ राष्ट्रीय फॅक्टशीटचे अनावरण

तंबाखूसेवन

  • १३ ते १५ वयोगटातील जवळपास एक पंचमांश विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यात (तंबाखू ओढणे, धूरविरहित किंवा इतर) कोणत्या ना कोणत्या प्रकारे तंबाखूचे सेवन केलेले आहे. सध्या (गेल्या तीस दिवसांत) तंबाखूच्या सेवनाचे प्रमाण ८.५% आहे. तंबाखू सेवनाचे प्रमाण ४२ टक्क्यांनी घटल्याचे गेल्या दोन सर्वेक्षणांमधून (२००९-२०१९) लक्षात  आले आहे.
  • मुलांमध्ये तंबाखू सेवनाचे प्रमाण ९.६ टक्के तर मुलींमध्ये तेच प्रमाण ७.४ टक्के आहे.
  • तंबाखू ओढण्याचे प्रमाण ७.३ टक्के आहे, तर धूरविरहित तंबाखू सेवनाचे प्रमाण ४.१ टक्के आहे.
  • विद्यार्थ्यांमध्ये इ-सिगारेट वापराचे प्रमाण २.८ टक्के होते.
  • कोणत्याही प्रकारातील तंबाखूच्या वापराचे प्रमाण मुलींपेक्षा मुलांमध्ये अधिक होते.
  • विविध राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमधील विद्यार्थ्यांच्या तंबाखू सेवनाच्या प्रमाणाचा वेध घेतल्यास ते प्रमाण अरुणाचल प्रदेश आणि मिझोराम या राज्यात  सर्वाधिक म्हणजे प्रत्येकी ५८ टक्के आहे , तर हिमाचल प्रदेश आणि कर्नाटकात ते सर्वात कमी म्हणजे अनुक्रमे १.१ टक्के आणि १.२ टक्के एवढे आहे.

तंबाखूची ओळख होण्याचे वय

  • सिगारेट ओढणार्‍यांपैकी ३८% जणांना, बिडी ओढणार्‍यांपैकी ४७ टक्के जणांना  आणि  धूरविरहित तंबाखू सेवन करणार्‍यांपैकी ५२ टक्के जणांना  संबंधित व्यसनप्रकाराची ओळख त्यांच्या वयाच्या दहा वर्षांच्या आतच झालेली असते. सर्वसाधारणपणे ११.५ वर्षे १०.५ वर्षे आणि ९.९  वर्षे या वयात अनुक्रमे सिगारेट बिडी आणि धूरविरहित तंबाखूसेवन याची सवय  लागल्याचे आढळले आहे.

प्रसार माध्यमे आणि तंबाखू सेवन विरोधी संदेश

  • प्रसार माध्यमांमधील तंबाखू सेवन विरोधी संदेशाची दखल ५२ टक्के विद्यार्थ्यांकडून घेतली जाते.
  • १८ टक्के विद्यार्थी विक्रीच्या ठिकाणी असलेल्या तंबाखूच्या जाहिराती किंवा त्यासंबंधीचे संदेश यांची दखल घेतात.

Contact Us

    Enquire Now