जागतिक युनिकॉर्न निर्देशांक २०२१
- Hurun Research Institute (India) मार्फत जाहीर करण्यात आलेल्या २०२१च्या निर्देशांकानुसार भारताने USA आणि चीन नंतर तिसरा क्रमांक पटकावला.
- २०२० मध्ये भारताचा चौथा क्रमांक तर UKचा तिसरा क्रमांक होता.
- भारताने २०२१ या वर्षी ३३ नव्या युनिकॉर्न कंपन्यांची नव्याने भर घातली. भारताची एकूण युनिकॉर्न कंपन्यांची संख्या सध्या ५४ इतकी आहे.
सर्वात मौल्यवान कंपन्या | ||
क्र. | कंपनी | देश |
१. | Byle Dance | चीन |
२. | Ant Group | चीन |
३. | Spacex | US |
१५. | BYJU’S | भारत |
२८. | InMobi | भारत |
४९. | OYO | भारत |
देश आणि युनिकॉर्न कंपन्यांची संख्या
क्र. | देश | युनिकॉर्न कंपन्या |
१. | US | ४८७ (२५४ नव्याने भर) |
२. | चीन | ३०१ (७४ नव्याने भर) |
३. | भारत | ५४ (३३ नव्याने भर) |
४. | इंग्लंड (UK) | ३९ (१५ नव्याने भर) |
काय आहे युनिकॉर्न कंपनी?
- एक अब्ज अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्त बाजारमूल्य असणाऱ्या खासगी स्टार्टअप कंपन्यांना ‘युनिकॉर्न कंपन्या’ असे संबोधतात.
- अडचणीच्या ठरणाऱ्या भारतातील काही नियमांमुळे नवोद्यमी (स्टार्टअप) उपक्रमांना भारत सोडून इतर देशांत बस्तान हलवावे लागत होते. मात्र ‘स्टार्टअप इंडिया’ सारख्या उपक्रमांमुळे गेल्या आठ महिन्यांत युनिकॉर्न स्टार्टअपची संख्या झपाट्याने वाढली आहे.
- २०२१ हे वर्ष सर्वात यशस्वी वर्ष ठरले असून एकाच वर्षात सर्वाधिक १०५८ युनिकॉर्न कंपन्यांची जगभरात भर पडली आहे.