जागतिक यादीत भारताच्या तीन महासंगणकांना स्थान

जागतिक यादीत भारताच्या तीन महासंगणकांना स्थान

  • जगातील पहिल्या 500 महासंगणकांमध्ये भारतातील परमसिद्धी एआय, मिहिर आणि प्रत्युष या तीन महासंगणकांनी स्थान मिळवले आहे.
  • यादीतील पहिल्या 100 महासंगणकांमध्ये ‘परमसिद्धी एआय’ या महासंगणकाचा समावेश आहे.
  • ‘टॉप 500 सुपर कम्प्युटर्स’ ही यादी नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली. यादीमध्ये पहिल्या शंभर महासंगणकांमधील सर्वाधिक महासंगणक जपान, अमेरिका, जर्मनी, इटली आणि फ्रान्स या देशांतील आहेत.
  • जपानच्या 442 पेटाफ्लॉप क्षमतेच्या ‘फुगाकू’ या महासंगणकाने सुपर कम्प्युटिंगमध्ये नवीन विक्रम नोंदवत पहिले स्थान प्राप्त केले आहे.
  • पुण्यातील सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स कम्प्युटिंगने (C-DAC) संकल्पित केलेला ‘परमसिद्धी एआय’ हा महासंगणक विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय यांनी नॅशनल सुपर कम्प्युटिं मिशन अंतर्गत विकसीत केला.
  • कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यात आलेल्या या महासंगणकाचा शिक्षण, अवकाश, शेती, संरक्षण आणि राष्ट्रीय सुरक्षा, आरोग्य, पूर अंदाज अशा विविध क्षेत्रांतील कामांसाठी उपयोग होत आहे.
  • यादीमध्ये या महासंगणकाने 53वे  स्थान मिळवले आहे.
  • तर पुण्यातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ डॉपिकल मॅनेजमेंटमध्ये (आयआयटीएम) असलेला प्रत्युष हा महासंगणक 77व्या स्थानी आहे.
  • महासंगणकांच्या यादीमध्ये 144व्या स्थानी असलेला ‘मिहिर’ हा महासंगणक नोएडातील नॅशनल सेंटर फॉर मिडियम रेंज वेदर फोरकास्ट (NCMRWF) या संस्थेमध्ये कार्यान्वित आहे.
  • भूविज्ञान मंत्रालयाला हवामान अंदाजांचा दर्जा सुधारण्यासाठी या महासंगणकाची मोठी मदत होत आहे.
  • ही एकूण यादीची 55वी आवृत्ती आहे.
  • चीनचे सर्वाधिक 212 महासंगणक
  • चीनमधील तीन महासंगणक पहिल्या शंभरमध्ये आहेत, तर यादीतील सर्वाधिक 212 महासंगणक चीनचे असल्याचे दिसून येते.
  • त्याखालोखाल अमेरिकेचे 113, जपानचे 34 महासंगणक आहेत.

 

जगातील पहिले 5 महासंगणक पुढीलप्रमाणे – 

 

नाव देश
फुगाकू जपान
समोट अमेरिका
सिएरा अमेरिका
सनवे र्तेहुलाईट चीन
तियानहे-2ए चीन

भारतातील महासंगणक

नाव स्थान
परमसिद्धी एआय 63 वे
प्रत्युष 77 वे 2020, 53 वे 2019
मिहिर 144 वे 2020, 86 वे 2019

Contact Us

    Enquire Now