जागतिक बँकेच्या मानव भांडवल निर्देशांकात २०२० मध्ये भारत ११६ वा
- २०२० चा मानव भांडवल निर्देशांक (Human Capital Index) हा मानवी विकास सराव समूह आणि जागतिक बँकेच्या डेव्हलपमेंट इकॉनॉमिक ग्रुप यांच्यातील सहकार्याने आहे.
- वर्ल्ड बँकेने ‘द ह्यूमन कॅपिटल इंडेक्स २०२० अपडेट : ह्यूमन कॅपिटल इन द टाइम ऑफ कोव्हिड-१९’ या नावाचा अहवाल जाहीर केला.
- १६ सप्टेंबर २०२० रोजी जाहीर केलेल्या मानव भांडवल निर्देशांक २०२० मधील १७४ देशांमध्ये भारत ११६ व्या स्थानावर आहे.
- मानवी भांडवल (Human Capital) म्हणजे सवयी, ज्ञान, सामाजिक आणि व्यक्तिमत्त्व गुणांचा साठा जो श्रम करण्याची शक्ती दर्शवितो जेणेकरून आर्थिक मूल्य निर्माण होईल.
एचसीआयमधील पहिले तीन देश :
१) सिंगापूर (०.८८)
२) हाँगकाँग आणि चीन (०.८१)
३) जपान (०.८०)
११६ वा – भारत (०.४९)
जागतिक बँकेबद्दल :
- ही बँक पुनर्रचना व विकासासाठीची आंतरराष्ट्रीय बँक या नावाने ओळखली जाते.
- स्थापना : जुलै १९४४
- मुख्यालय : वाॉशिंग्टन, (अमेरिका)
- सदस्य राष्ट्रे : १८९ (१८९ वा – नौरू)
- भारत २७ डिसेंबर १९४५ ला जागतिक बँकेचा सदस्य झाला.
- जागतिक बँक सदस्य राष्ट्रांना पुनर्रचना व आर्थिक विकास कामांसाठी कमी व्याजदराने दीर्घ मुदतीचे कर्ज