जागतिक बँकेचे शिक्षणविषयक सल्लागार म्हणून डिसले यांची निवड
- जागतिक शिक्षक पुरस्कार जिंकणारे पहिले भारतीय शिक्षक रणजितसिंह डिसले यांची जागतिक बँकेचे शिक्षणविषयक सल्लागार म्हणून नियुक्ती झाली आहे.
- डिसले गुरुजींची निवड जून 2021 ते जून 2024 अशा तीन वर्षांच्या कालावधीसाठी झाली आहे.
रणजितसिंह डिसले यांनी केलेले कार्य
- ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी आणि क्यूआर कोड पाठ्यपुस्तकांच्या माध्यमातून राज्यातच नव्हे तर देशात शिक्षणासाठी केलेल्या प्रयत्नासाठी त्यांना जागतिक शिक्षक पुरस्कार 2020 मिळाला आहे.
- हा पुरस्कार मिळणारे डिसले हे पहिलेच भारतीय शिक्षक ठरले आहेत.
- क्यूआर कोडच्या माध्यमातून शिक्षणात डिजिटल क्रांती करण्याचा प्रयोग केला. याच धर्तीवर 2017 साली महाराष्ट्र शासनाने पाठ्यपुस्तकांना क्यूआर कोड देण्याची योजना केली.
- 2018 मध्ये NCERT (National Council of Education Research and Training) पाठ्यपुस्तकांना क्यूआर कोड योजना लागू केली.
- स्काइप इन क्लासरूम या माध्यमातून विद्यार्थ्यांना भासमान पद्धतीने जगाची सफर घडवून आणत विविध देशातील शिक्षकांशी व विद्यार्थ्यांशी संवाद साधत.
- लेट्स् क्रॉस द बॉर्डर्स प्रकल्पाद्वारे भारत आणि पाकिस्तान, पॅलेस्टाईन, इराक, इराण, अमेरिकेमधील युवकांना एकमेकांशी जोडण्याचे कार्य केले.
- त्यांनी केलेल्या वनीकरणाद्वारे वनांचे प्रमाण 25 टक्क्यांवरून 30 टक्के झाल्याने 2012 चा Wipro Nature for Society हा पुरस्कार दिला आहे.
- सोलापूर जिल्ह्यातील परितेवाडी गावातील जिल्हा परिषद शाहेत मुलींची पटनोंदणी झाली आणि उपस्थिती वाढवणे तसेच बालविवाह प्रमाण कमी करण्याचेही काम केले आहे.
- मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नडेला यांनी त्यांच्या 2010सालमधील ‘Hit Refresh’ या पुस्तकामध्ये डिसले यांच्या कार्याचा गौरव केला आहे.