जागतिक पोषण अहवाल – २०२१

जागतिक पोषण अहवाल – २०२१

 • जागतिक आरोग्य संघटनेमार्फत नोव्हेंबर २०२१मध्ये जागतिक पोषण अहवाल २०२१ जाहीर केला.
 • या अहवालानुसार भारतासह जगभरातील बहुतांश देश जागतिक पोषण ध्येय, २०२५पर्यंत गाठण्यास अपयशी ठरणार आहे.
 • २०१२ मध्ये जागतिक आरोग्य परिषदेने (WHO ची निर्णय घेणारी संख्या) २०२५ सालापर्यंत सहा पोषण लक्ष्ये निश्चित केली. त्यानुसार
 • अ) पाच वर्षांखालील मुलांमध्ये स्टटिंग ४० टक्के कमी करणे.
 • ब) १९-४९ वयोगटातील महिलांमध्ये अशक्तपणाचे प्रमाण ५० टक्के कमी करणे.
 • क) जन्माच्यावेळी कमी वजनात ३० टक्क्यांनी घट करणे.
 • ड) पहिल्या सहा महिन्यांत स्तनपानाचा दर किमान ५० टक्क्यांपर्यंत वाढविणे.
 • इ) बालपणात जास्त वजन वाढू नये याची खात्री करणे.
 • फ) बालपण वाया जाण्याचे प्रमाण ५ टक्क्यांपेक्षा कमी करणे.

भारताची प्रगती

 • ॲनिमियाग्रस्त महिला – भारतात २०१६च्या तुलनेने २०२०मध्ये ॲनेमियाग्रस्त महिलांची संख्या ५२.६% वरून ५३% इतकी वाढली आहे.
 • Wasting (उंचीच्या प्रमाणात कमी वजन)
 • भारतात ५ वर्षांखालील एकूण बालकांपैकी १७% बालके वास्टिंगग्रस्त आहेत.
 • Stunting – (वयानुसार कमी उंची) भारतात ५ वर्षांखालील एकूण बालकांपैकी ३४ टक्के बालके स्टंटिंगग्रस्त आहे.

जागतिक पोषण अहवालाविषयी –

 • सुरुवात – २०१४ (WHO मार्फत प्रकाशित)
 • उद्देश – २०१५ पर्यंत साध्य करण्यासाठी असणाऱ्या लक्ष्यांबाबत देशांच्या कामगिरीचा वार्षिक आढावा घेणे.

Contact Us

  Enquire Now