जागतिक उपासमार निर्देशांक, २०२१ (Global Hunger Index, 2021)

जागतिक उपासमार निर्देशांक, २०२१ (Global Hunger Index, 2021)

 • आयर्लंडमधील ‘Concern Worldwide’ संस्था आणि जर्मनीतील ‘Welt Hunger Life’ संघटना यांनी संयुक्तपणे तयार केलेला सोळावा ‘जागतिक उपासमार निर्देशांक-२०२१’ प्रसिद्ध केला.
 • या निर्देशांकानुसार जगातील ११६ देशांच्या यादीत भारत १०१ व्या स्थानी आहे.
 • २००६ पासून दरवर्षी हा निर्देशांक मोजला जातो.
 • आंतरराष्ट्रीय अन्न धोरण संशोधन संस्था (IFPRI) या निर्देशांकांचे गुण मोजते.
 • GHI निर्देशांक ० ते १०० दरम्यान असतो; ० म्हणजे उपासमार नसणे आणि १०० म्हणजे आत्यंतिक उपासमार असणे होय.
 • जागतिक उपासमार निर्देशांकांची रचना – ३ मापदंड, ४ निर्देशांक

माहिती संकलन :

अ) कुपोषण अन्न व कृषी संघटना
ब) उंचीच्या तुलनेत कमी वजन व वजनाच्या तुलनेत कमी उंची जागतिक आरोग्य संघटना, जागतिक बँक, युनिसेफ
क) बाल मृत्यूदर यूएन – इंटर एजन्सी ग्रुप फॉर चाइल्ड मोर्टेलिटी एस्टिमेशन

उपासमार तीव्रतेचे मोजमाप :

पातळी गुण
कमी ≤ ९
मध्यम १०.१९९
गंभीर २० – ३४.९
चिंताजनक ३५ – ४९.९
अत्यंत चिंताजनक ≥ ५०

पहिले स्थान

 • ५ पेक्षा कमी गुण मिळविणाऱ्या पहिल्या १८ देशांना कोणतीही वैयक्तिक क्रमवारी देण्यात आलेली नाही. त्यांना १-१८ संयुक्त क्रमांक देण्यात आला आहे.
 • या १८ देशांत बेलारूस प्रथम स्थानावर असून चीन, ब्राझिल, कुवेत यासारख्या देशांचा समावेश आहे.
 • १९व्या स्थानी अर्जेंटिना हा देश आहे.

शेवटचे स्थान : 

क्रमवारी देश गुण
११२ कांगो प्रजासत्ताक ३९.०
११३ चाड ३९.६
११४ सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक ४३.९
११५ येमेन ४५.१
११६ सोमालिया ५०.८

भारताची स्थिती :

 • भारताचा क्रमांक : ११६ देशांत १०१ (२०२०-९४/१०२)
 • भारताला मिळालेले गुण : २७.५ (२०२०-२७.२)
 • भारतात ‘गंभीर उपासमार’ आहे.
 • उंचीच्या तुलनेत कमी वजन असलेले बालक : १७.३%
 • वजनाच्या तुलनेत कमी उंची असलेले बालक : ३४.७५%

मागील काही वर्षांतील भारताची स्थिती : 

वर्ष एकूण देश क्रमवारी
२०१८ १९ १०३
२०१९ ११७ १०२
२०२० १०७ ९४
२०२१ ११६ १०१

ब्रिक्स देशांतील स्थिती : 

१) ब्राझील (१८)

२) चीन (१८)

३) रशिया (२५)

४) दक्षिण आफ्रिका (६०)

५) भारत (१०१)

भारताच्या शेजारील देश : चीन (१८), श्रीलंका (६५), म्यानमार (७१), नेपाळ (७६), बांग्लादेश (७६), पाकिस्तान (९२)

पोषण आणि आरोग्याशी संबंधित काही महत्त्वाच्या उपाययोजना

अ) ईट राइट इंडिया चळवळ

ब) राष्ट्रीय पोषण अभियान

क) प्रधानमंत्री मातृवंदना योजना

ड) राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायदा, २०१३

इ) मिशन इंद्रधनुष

Contact Us

  Enquire Now