जागतिक आरोग्य सुरक्षा निर्देशांक २०२१
- नुकतेच २०२१ वर्षासाठीचा जागतिक आरोग्य सुरक्षा निर्देशांक जारी करण्यात आला आहे.
- सदर निर्देशांक न्यूक्लिअर थ्रेट इनिशिएटिव्ह (एनटीआय) आणि जॉन्स हॉपकिन्स सेंटर यांच्या भागीदारीतून विकसित केले गेले आहे.
- एनटीआय ही एक ना-नफा जागतिक सुरक्षा संस्था आहे जी मानवतेला धोका निर्माण करणारे आण्विक आणि जैविक धोके कमी करण्यावर लक्ष केंद्रित करते.
- जॉन्स हॉपकिन्स सेंटर सार्वजनिक आरोग्यामध्ये संवादाची महत्त्वपूर्ण भूमिका ओळखण्यासाठी महत्वाची भूमिका पार पाडते.
- प्रतिबंध, शोध आणि अहवाल, जलद प्रतिसाद, आरोग्य प्रणाली, आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन, जोखीम वातावरण या सहा निकषांचा विचार सदर निर्देशांक काढताना केला जातो.
- निर्देशांक ०-१०० पर्यंत देशांच्या क्षमतांचे मोजमाप करतो, १०० गुण हे सर्वोच्च स्तरावरील सज्जतेचे प्रतिनिधित्व करतात.
- कमी श्रेणी : ० आणि ३३.३ दरम्यान गुण मिळवणारे देश तळाच्या श्रेणीत असतात.
- मध्यम श्रेणी: जे देश ३३.४ आणि ६६.६ च्या दरम्यान गुण मिळवतात ते मध्यम श्रेणीत असतात
- उच्च श्रेणी : जे देश ६६.७ आणि १००च्या दरम्यान गुण मिळवतात ते वरच्या किंवा “टॉप” श्रेणीमध्ये असतात.
- ४२.८ (१०० पैकी) गुणांसह भारत २०१९च्या तुलनेत ०.८ गुणांनी घसरला आहे.
- बांगलादेश, श्रीलंका आणि मालदीव या भारताच्या तीन शेजारी देशांनी १-१.२ गुणांनी त्यांची गुणसंख्या सुधारली आहे.
- २०२१ मध्ये, कोणत्याही देशाने श्रेणीच्या सर्वोच्च स्तरावर गुण मिळवले नाहीत आणि कोणत्याही देशाने ७५.९ पेक्षा जास्त गुण मिळवले नाहीत.
भारताच्या आरोग्य प्रतिसादाची स्थिती :
- २००९ पासून राजस्थान, महाराष्ट्र, तामिळनाडू आणि इतर राज्यांमध्ये होत असेलेले इन्फ्लूएंझा A (H1N1) चे उद्रेक अधिक चांगल्या प्रकारे रुग्णांना शोधणे, लक्षणांबद्दल जागरूकता आणि अलग ठेवण्याची गरज अधोरेखित करत आहे.
- कोविड-१९ महामारीने भारताच्या आरोग्य सेवा प्रणालीचा पाया देखील हादरवला आहे.
- भारतातील सरकारचा आरोग्यावरील खर्च हा सकल देशांतर्गत उत्पादनाच्या १.३५% पेक्षा कमी आहे, जो मध्यम उत्पन्न असलेल्या देशासाठी कमी आहे.
- देशाच्या सध्याच्या १३५ कोटी लोकसंख्येच्या अंदाजानुसार प्रत्येक १,४४५ भारतीयांमागे एक डॉक्टर आहे, जो जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) १,००० लोकांसाठी एका डॉक्टरच्या विहित नियमापेक्षा कमी आहे.
हवामान बदलाचा परिणाम:
- हवामानाच्या धक्क्यांमुळे भारताची आरोग्य स्थिती बिघडत आहे.
- हवामान असुरक्षितता निर्देशांकानुसार, ८०% पेक्षा जास्त भारतीय हवामान असुरक्षित जिल्ह्यांमध्ये राहतात.