जागतिक आरोग्य दिन
- जागतिक आरोग्य संघटना (WHO) ची स्थापना ७ एप्रिल १९४८ रोजी झाली होती. या दिवसाचा गौरव म्हणून दरवर्षी ७ एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो.
- जागतिक आरोग्य संघटनेने हा दिवस साजरा करण्यास १९५० मध्ये सुरुवात केली.
- जगभरातील लोकांना आरोग्याप्रति जागरूक करण्यासाठी आणि निरोगी आरोग्य हीच आयुष्याची शिदोरी आहे, हे लोकांना पटवून देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
- यावर्षीच्या आरोग्यदिनाची थीम ‘Building a fairer, healthier world’ अशी ठेवण्यात आली आहे.
जागतिक आरोग्य संघटना (World Health Organisation – WHO)
- स्थापना : ७ एप्रिल १९४८
- मुख्यालय : जिनिव्हा, स्वित्झर्लंड
- सदस्य देश : १९४
- सार्वभौमिक आरोग्य सल्ला, सार्वजनिक आरोग्याच्या जोखमीवर देखरेख, आरोग्य आपत्कालीन प्रतिक्रियांचे समन्वय, मानवी आरोग्य प्रसार इ. या संघटनेची प्रमुख कार्ये आहेत.
- संयुक्त राष्ट्राची ही एक प्रमुख उपशाखा आहे.
- संघटनेतील प्रमुख :
१) टेड्रोस अधानोम (DG)
२) सौम्या स्वामीनाथन (Deputy DG)
३) जेन एलिसन (Deputy DG)