जयंत चौधरी ‘रालोद’चे अध्यक्ष

जयंत चौधरी ‘रालोद’चे अध्यक्ष

  • राष्ट्रीय लोक दलाच्या (रालोद) राष्ट्रीय अध्यक्षपदी जयंत चौधरी यांची मंगळवारी नियुक्ती झाली.
  • त्यांचे पिता अजित सिंह यांचे कोरोनामुळे निधन झाल्यामुळे हे पद रिक्त झाले होते.
  • चौधरी केवळ ४२ वर्षांचे आहेत. याआधी ते उपाध्यक्ष होते. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या व्हर्च्युअल बैठकीत त्यांच्या नियुक्तीचा निर्णय झाला.
  • पक्षाचे सरचिटणीस त्रिलोक त्यागी यांनी चौधरी यांचे नाव सुचविले. त्यास माजी खासदार आणि राष्ट्रीय सरचिटणीस मुन्शीराम पाल यांनी अनुमोदन दिले. सर्व सदस्यांनी त्यास एकमताने पाठिंबा दिला.
  • चौधरी हे माजी खासदार असून त्यांनी दिल्ली विद्यापीठातून पदवी संपादन केली. त्यानंतर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथून पदव्युत्तर शिक्षण घेतले.
  • राष्ट्रीय लोक दल या पक्षाची स्थापना १९९६ साली अजित सिंह यांनी केली. या पक्षाला २५ वर्षे पूर्ण होत आहेत.

Contact Us

    Enquire Now