जम्मूत सहा तर काश्मिरमध्ये एक अतिरिक्त मतदार संघाची शिफारस
- जम्मू व काश्मिरसाठीच्या सीमांकन आयोगाने जम्मू भागासाठी सहा तर काश्मिरसाठी एका अतिरिक्त मतदार संघाची शिफारस केली आहे.
- सोळा मतदारसंघ अनुसूचित जाती व जमातीसाठी राखून ठेवण्यास सांगितले आहे.
- पीडीपी, जेके अपनी पार्टी आणि भाजपाची मित्रत्वाचे संबंध असल्याचे मानले जाणारा पीपल्स कॉन्फरन्स या पक्षानी सीमांकन आयोगाच्या शिफारसीला विरोध केला आहे.
- काश्मिरला विधानसभेच्या ४६, तर जम्मूत ३६ जागा आहेत.
- सीमांकन आयोगातील जम्मू व काश्मीरमधील लोकसभेचे ५ खासदार हे आयोगातील सहयोगी सदस्य व मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा हे त्याचे पदसिद्ध सदस्य.