जगातील सर्वात मोठ्या प्राणी संग्रहालयाची उभारणी गुजरातमध्ये
- गुजरातमधील जामनगर जिल्ह्यात जगातील सर्वात मोठ्या प्राणी संग्रहालयाची उभारणी रिलायन्स इंडस्ट्रीजद्वारे होणार आहे.
- रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचे चिरंजीव अनंत अंबानी यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट समजला जातो.
- गुजरात हे रिलायन्स उद्योगसमूहाचे होम ग्राऊंड म्हणून ओळखले जाते.
- जामनगरच्या मोती खवडी जवळील रिलायन्स रिफायनरी प्रकल्पाजवळ प्राणी संग्रहालयाची उभारणी होणार आहे.
- जवळपास ३०० एकर जमिनीवर उभारणी व 100 हून अधिक प्रकारचे प्राणी पहायला मिळणार आहेत.
- स्थानिक प्रशासनाच्या मदतीसाठी एक रेस्क्यू सेंटरची उभारणी करण्यात येणार आहे.
- या प्रकल्पाचे नाव ग्रीन्स जिऑलॉजिकल रेस्क्यू अँण्ड रिहॅबिलिटेशन किंग्डम. आता जगातील सर्वात उंच, सर्वात मोठे आणि सर्वात लांब प्रकल्प गुजरातमध्ये पाहायला मिळणार.
- सर्वात मोठा पुतळा – स्टॅच्यू ऑफ युनिटी.
- सर्वात लांब सिंचन कालवा सर्वात मोठा नूतनीकरण योग्य अशा अक्षय ऊर्जा प्रकल्प.
- जगातील सर्वात मोठा प्रकल्प – ग्रीन जिऑलॉजिकल रेस्क्यू अँण्ड रिहॅबिलिटेशन किंग्डम
- जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम – नरेंद्र मोदी स्टेडियम