चौथ्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेचे यजमानपद हरियाणाकडे

चौथ्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेचे यजमानपद हरियाणाकडे

  • चौथ्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेचे यजमानपद हरियाणाकडे असणार आहे. हरियाणातील पंचकुला येथे या स्पर्धा होणार आहेत. टोकियो ऑलिम्पिकनंतर या स्पर्धा होणार आहेत.
  • आधीच्या तीन खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत २०१८, २०१९, २०२० मध्ये अनुक्रमे पहिले, दुसरे, दुसरे स्थान हरियाणाने पटकावले होते.

खेलो इंडिया कार्यक्रमाविषयी :

    • २० सप्टेंबर २०१७ रोजी सुधारित कार्यक्रमाला मंजुरी. 
    • उद्देश ः व्यक्तिमत्त्व विकास, सामाजिक विकास, आर्थिक विकास आणि राष्ट्रीय विकासासाठी एक साधन म्हणून खेळाला मुख्य प्रवाहात आणणे.

 

  • वैशिष्ठ्ये :

 

१. दरवर्षी निवडक क्रीडा प्रकारातील १००० प्रतिभावान युवा खेळाडूंना सामावून घेतले जाईल.

२. या योजनेअंतर्गत निवडण्यात आलेल्या प्रत्येक खेळाडूला  सलग ८ वर्षे वार्षिक ५ लाख रुपये शिष्यवृत्ती.

३. देशभरात २० विद्यापीठांना सर्वोत्कृष्ट क्रीडा केंद्र म्हणून प्रोत्साहन देणे.

Contact Us

    Enquire Now