चौथा BRAP २०१८-१९ रँकिंग: आंध्रप्रदेश EODB मध्ये अव्वल
- ५ सप्टेंबर २०२० केंद्रीय अर्थ व कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामण यांनी राज्य व्यापार सुधार कृती योजना (BRAP) रँकिंगची २०१८-१९ ची चौथी आवृत्ती जाहीर केली.
- जी वाणिज्य व उद्योग मंत्रालयांतर्गत, औद्योगिक पदोन्नती व अंतर्गत व्यापार विभागाने (DPIIT) ने तयार केली.
- या रँकिंगनुसार ईझ ऑफ डुईंग बिझनेस (EODB) मध्ये आंध्रप्रदेश अव्वल, उत्तरप्रदेश दुसरा, तेलंगणा तिसरा व केंद्रशासित प्रदेशांमध्ये दिल्ली अव्वल आहे. (सर्वात कमी अरुणाचलप्रदेश, मेघालय, नागालँड, सिक्कीम, त्रिपुरा)
- EODB हा DPIIT व जागतिक बँकेचा संयुक्त उपक्रम आहे. त्यामुळे राज्यांतील एकूण व्यवसायाचे वातावरण सुधारेल.
- BRAP रँकिंगमध्ये कामगार नियमन, पर्यावरण, जमीन उपलब्धता इ. सारख्या १२ व्यवसाय नियमकांचा समावेश आहे.
- राज्यांमध्ये गुंतवणूक आकर्षित करणे व Ease of Doing Business वाढवण्याचे मोठे उद्दिष्ट साध्य करणे हे रँकिंगमधील कारण आहे.
BRAP रँकिंग:
- २०१४-१५ मध्ये सुरू झालेली ही रॅकिंग राज्यांतील EODB चे प्रतिनिधित्व करते. त्यात व्यावसायिक उपक्रमांनुसार वाढीव पारदर्शकता, कार्यकुशलता व सरकारी नियामक कामांची कार्यक्षमता यांची तपासणी करण्यात येते.
- वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या २०१९-२० आकडेवारीनुसार अमेरिका सलग दुसर्या वर्षी भारताचा अव्वल व्यापार भागीदार ठरला.
- २०१८-१९ मधील भागीदारी – ८७.९६ अब्ज डॉलर्स
- २०१९-२० मधील भागीदारी – ८८.७५ अब्ज डॉलर्स
- वाणिज्य व उद्योग मंत्रालय – (MOCI)
- केंद्रीय मंत्री – पियुष वेदप्रकाश गोयल
- राज्यमंत्री – हरदीपसिंग पुरी, सोमप्रकाश