चैन्नई सुपर किंग्जने पटकावले चौथ्यांदा अजिंक्यपद
- संयुक्त अरब अमिरातीत झालेल्या अंतिम स्पर्धेत कोलकता संघाचा २७ धावांनी पराभूत करत धोनीच्या संघाने चौथ्यांदा अजिंक्यपद जिंकले.
- अमिरातीत झालेल्या गतवर्षीच्या स्पर्धेत बाद होणारा पहिला संघ चैन्नईच होता आणि यंदाच्या आयपीएलचा विजयी संघ चैन्नईच ठरला.
२००८ ते २०२१ पर्यंत आयपीएल विजेते संघ :
आयपीएल विजेते संघ | वर्ष |
१. राजस्थान रॉयल्स | २००८ |
२. डेक्कन चार्जर्स | २००९ |
३. चैन्नई सुपर किंग्ज | २०१० |
४. चैन्नई सुपर किंग्ज | २०११ |
५. कोलकता नाईट रायडर्स | २०१२ |
६. मुंबई इंडियन्स | २०१३ |
७. कोलकता नाईट रायडर्स | २०१४ |
८. मुंबई इंडियन्स | २०१५ |
९. सनरासझर्स हैदराबाद | २०१६ |
१०. मुंबई इंडियन्स | २०१७ |
११. चैन्नई सुपर किंग्ज | २०१८ |
१२. मुंबई इंडियन्स | २०१९ |
१३. मुंबई इंडियन्स | २०२० |
१४. चैन्नई सुपर किंग्ज | २०२१ |
- आयपीएलचे सर्वाधिक विजेतेपद जिंकणारा संघ मुंबई इंडियन्स एकूण पाच अजिंक्यपद जिंकले आहे.
- त्यानंतरचा सर्वाधिक विजेतेपद जिंकणारा दुसरा संघ, चैन्नई सुपर किंग्ज चार वेळा अजिंक्यपद जिंकले आहे.
धोनीचे विक्रम
- आयपीएलमध्ये तीनशे ट्वेन्टी-२० सामन्यात नेतृत्व करणारा तो पहिला कर्णधार ठरला आहे.
- भारतीय संघ, चैन्नई सुपर किंग्ज आणि रायझिंग पुणे-सुपर जायंटस् अशा तीन संघाचे नेतृत्व धोनीने केले आहे.
- ट्वेन्टी-२० विश्वकरंडक, ५०-५० षटकांचा विश्वकरंडक आणि चॅम्पियन्स लीग असे आयसीसीचे तीनही करंडक जिंकणारा तो क्रिकेट विश्वातला एकमेव कर्णधार आहे.
- धोनीनंतर सर्वाधिक सामन्यांत कर्णधारपद करण्याचा पराक्रम वेस्ट इंडिजच्या डॅरेन सॅमीच्या नावावर आहे.
- त्याने २०८ सामन्यात नेतृत्व केले आहे.
- तिसरा क्रमांक विराट कोहलीचा लागतो.
- त्याने १८५ सामन्यांत कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळली आहे.
आयपीएल (IPL) Indian Premier League
- स्थापना – २००७ (BCCI द्वारे [Board of Control for Cricket in India]
- २०२१ आयपीएल स्पर्धेला आयपीएल १४ असेही म्हणतात कारण हे आयपीएलचे १४ वा हंगाम होता.
- सहभागी संघ – ८
- सामने – ६०