चीन मलेरियामुक्त म्हणून घोषित

चीन मलेरियामुक्त म्हणून घोषित

 • जागतिक आरोग्य संघटनेने नुकतेच चीनला मलेरिया मुक्त म्हणून घोषित केले आहे.
 • पश्चिम पॅसिफिक भागातील ऑस्ट्रेलिया, सिंगापूर आणि ब्रुनेईनंतर चीन मलेरिया मुक्त म्हणून घोषित झालेला केवळ चौथा देश आहे.
 • जगभरामध्ये जागतिक आरोग्य संघटनेने केवळ ४० देशांना मलेरिया मुक्त म्हणून घोषित केले आहे. त्यात सर्वात अलिकडे अल्जेरिया (२०१९) आणि एल साल्वाडोर (२०२१) यांचा समावेश आहे.
 • जागतिक आरोग्य संघटना अशा देशाला मलेरिया मुक्त घोषित करते ज्या देशाने मागील तीन वर्षांपासून ॲनाफिलीस डासांपासून  संक्रमित होणाऱ्या मलेरियाची साखळी यशस्वीरीत्या थांबवली असेल.
 • शिवाय पुन्हा संक्रमण न होऊ देण्याची क्षमता त्या देशाने आत्मसात केलेली असावी.
 • परंतु यासंबंधीचा अंतिम निर्णय हा जागतिक आरोग्य संघटनेच्या महासंचालकांचा असतो.

भारत आणि मलेरिया ( हिवताप)

 • भारत असा एकमेव उच्च संक्रमण असणारा देश आहे ज्याने सन २०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये १७.६% घट नोंदविली आहे.
 • २०१६ च्या तुलनेत २०१७ मध्ये मलेरियाचा संक्रमण दर सुमारे २४ टक्क्यांनी कमी करण्यात भारताला यश आले होते.
 • १९५१ मध्ये सुमारे साडेसात कोटी लोकांना मलेरियाची लागण झाली होती.
 • त्यामुळे सुरुवातीपासून भारतामध्ये मलेरिया हा अतिशय गंभीर आजार समजला जातो.
 • १९५३ मध्ये राष्ट्रीय मलेरिया नियंत्रण कार्यक्रम भारताने सुरू केला आणि आपल्या देशामध्ये राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांना सुरुवात झाली.
 • पुढे १९५८ राष्ट्रीय हिवताप निर्मूलन कार्यक्रम जाहीर करण्यात आला.
 • २००५ मध्ये राष्ट्रीय गहन हिवताप नियंत्रण कार्यक्रम जाहीर केला ज्यामध्ये डीडीटी फवारणी, मॅलॅथिऑनचा वापर, गप्पी मासे पाळणे इत्यादी बाबींचा समावेश  होता.
 • ११ फेब्रुवारी २०१६ ला केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी २०३० पर्यंत हिवतापाचे निर्मूलन आणि शाश्वत विकास ध्येय गाठण्यासाठी मलेरिया निर्मूलनासाठी राष्ट्रीय चौकट (National Framework For Maleria Elimination : २०१६ – २०३०) जाहीर केली.
 • या चौकटीनुसार २०२२ पर्यंत कमी लागण  हे असलेल्या राज्यातून मलेरियाचे निर्मूलन करणे, २०२४ पर्यंत सर्व राज्यांमधून निर्मूलन करणे, २०२७ पर्यंत मलेरियाचा संपूर्ण प्रसार रोखणे आणि २०३० पर्यंत मलेरिया मुक्त पातळी गाठणे याचा समावेश आहे.
 • वरील प्रयत्न बघता आणि देशातील सध्या असणारी मलेरियाची स्थिती बघता भारताने खूप चांगली प्रगती केलेली आहे.
 • मलेरिया निर्मूलनामध्ये ओदिशा हे राज्य दमन (Durgama Anchalare Malaria Nirakaran – DAMaN) या उपक्रमामुळे आघाडीचे राज्य बनले आहे.
 • मलेरिया आजार प्लाझ्मोडियम या आदिजीवामुळे होतो.या आदिजीवाचा प्रसार ॲनाफिलीस या प्रजातीच्या मादी डासामुळे होतो.

Contact Us

  Enquire Now