चीनमधील प्रयोगशाळेतून कोरोना विषाणूच्या प्रसाराची शक्यता नाही
- संपूर्ण जगात हाहाकार माजविलेल्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव चीनमधील प्रयोगशाळेतून झाला असण्याची शक्यता नाही, तर काही प्राण्यांच्या प्रजातींमधून मानवाला त्याची लागण झाली असावी, असा निष्कर्ष जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांनी नोंदवला आहे.
- चीनच्या मध्यवर्ती भागात असलेल्या वुहान भागात डिसेंबर २०१९मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यामुळे WHO च्या पथकाने वुहान हेच कोरोनाचे खुद्द उगमस्थान आहे का, याबाबत तपास केला.
- WHO चे अन्न सुरक्षा आणि प्राण्यांना होणाऱ्या रोगाचे तज्ज्ञ पीटर बेन एमबारेक यांनी तपासातून उघड झालेल्या माहितीच्या आधारे वरील निष्कर्ष व्यक्त केला.
- वुहानमधील प्रयोगशाळाच कोरोनाचे उगमस्थान असल्याचे म्हटले जात होते. मात्र चीनने याला स्पष्टपणे नकार दिला. WHOच्या पथकामध्ये विविध देशांच्या तज्ज्ञांचा समावेश होता. या पथकाने रुग्णालये, संशोधन संस्था, बाजारपेठा आणि बऱ्याच ठिकाणांना भेटी दिल्या.
- वाढत्या आंतरराष्ट्रीय दबावानंतर चीनने WHOच्या तपासणी पथकास मान्यता दिली. कोरोनामुळे आतापर्यंत जगभरात २२ लाख लोकांचा मृत्यू झाला आहे.