चीनने 2015 मध्ये कोरोना विषाणूचा वापर जैविक अस्त्र म्हणून करण्याचा विचार
- अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याला प्राप्त झालेल्या कागदपत्रावरून कोरोना विषाणूचा वापर जैविक अस्त्र म्हणून करण्याचा विचार चीनच्या लष्करी वैज्ञानिकांनी कोविड 19 विषाणूचा प्रसार होण्याच्या पाच वर्षे आधीच म्हणजे 2015 मध्येच केला होता.
- 2015 मध्येच चीनी वैज्ञानिकांनी भाकित केले होते की, तिसरे महायुद्ध हे जैविक अस्त्रांचे असेल.
- अमेरिकेला प्राप्त झालेली कागदपत्रे, त्यांची शहानिशा सायबर तज्ज्ञांनी केले असून ती कागदपत्रे खरी आहेत.
- ब्रिटनमधील ‘द सन’ आणि ‘द ऑस्ट्रेलियन’ या वृत्तपत्राने प्रथम प्रसारित केलेल्या कागदपत्रांच्या आधारे ही माहिती दिली.
- अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने ही कागदपत्रे मिळवली.
- कागदपत्रावरून माहिती मिळते की, चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या कमांडर्सनी कोरोना विषाणूचा वापर जैविक युद्धासाठी करता येईल असे म्हटले होते, ही कागदपत्रे 2015 मध्येच तयार केली होती.
- अमेरिकी हवाई दलाचे कर्नल मायकेल जे. एनकॉफ यांनी दिलेल्या माहितीनुसार 2015 मध्येच चीनने तिसऱ्या जागतिक महायुद्धाची शक्यता वर्तविली होती.
- 2003 मध्ये कोरोनाचा विषाणू सार्सच्या रूपाने चीनमध्ये आला होता. त्याची मानवनिर्मित आवृत्ती तयार केली तर ते एक जैविक अस्त्र ठरू शकेल व ते दहशतवाद्यांनाही मागे टाकेल.
- या कागदपत्रावर आधारित ‘व्हॉट रिअली हॅपण्ड इन वुहान’ हे पुस्तक येणार आहे.
- 2019 मध्ये चीनमधील वुहान या शहरात पहिला कोरोना रुग्ण सापडला होता.
- पीपल्स लिबरेशनच्या कागदपत्रांवर एकूण 18 लेखकांची नावे असून त्यात काही वैज्ञानिक तर काही शस्त्रास्त्र तज्ज्ञांचा समावेश आहे.
- कोरोनाच्या उगमस्थानाची चौकशी बाहेरील संस्थांनी करण्याबाबत चीनचा विरोधक का आहे हे सुद्धा या प्रबंधामुळे स्पष्ट होते.
- हे प्रकरण मांसाहारी पदार्थांच्या बाजारपेठेतून उद्भवले असेल तर चौकशीस सहकार्य करणे चीनच्या हिताचे होते, तरीही चीन त्याविरुद्धच होते.