चीनच्या ‘झुरोंग’ या बग्गीचा मंगळावरील प्रवास सुरू; मंगळाची काढलेली छायाचित्रे चीनकडून प्रसिद्ध

चीनच्या ‘झुरोंग’ या बग्गीचा मंगळावरील प्रवास सुरू; 

मंगळाची काढलेली छायाचित्रे चीनकडून प्रसिद्ध 

 • अमेरिकेनंतर मंगळावर यशस्वीरीत्या बग्गी (रोव्हर) पोहोचवणारा चीन हा दुसरा देश ठरला आहे.
 • सात महिन्यांचा अंतराळ प्रवास करून आणि तीन महिने कक्षेमध्ये प्रवास केल्यावर शेवटच्या नऊ मिनिटांच्या खडतर प्रवासानंतर चीनचा झुरोंग रोव्हर मंगळावर उतरला आणि प्रवास सुरू झाला.
 • ‘तियानवेन-1’ या मोहिमेद्वारे चीनने हे रोव्हर पाठवले आहे. मंगळाच्या उत्तर गोलार्धात असलेल्या लाव्हापासून बनलेल्या पठारावर हे उतरविण्यात आले आहे. ‘युटोपिया प्लॅनेटिया’ या नावाने हे पठार ओळखले जाते.
 • लँडरला जोडून असलेल्या रॅम्पवरून झुरोंग रोव्हर उतरला आणि त्याने मंगळावरील लाल मातीला स्पर्श केला, असे चीनच्या अवकाश संशोधन संस्थेने म्हटले आहे. सहा चाकांची ही सौरगाडी असून तिचे वजन 240 किलो आहे. यामध्ये सहा वैज्ञानिक उपकरणे बसविण्यात आली आहेत. 
 • वैज्ञानिक उपकरणांमध्ये टेरेन कॅमेरा, मल्टी स्पेक्ट्रम कॅमेरा, पृष्ठभागाची नोंद घेणारे रडार, खनिजांचा शोध घेणारे डिटेक्टर, चुंबकीय क्षेत्राचे मोजमाप करणारे डिटेक्टर आणि हवामानाची नोंद घेणारे संयंत्र यांचा समावेश आहे.
 • तसेच झुरोंग या रोव्हरने काढलेली छायाचित्रे चीनने प्रसिद्ध केली आहेत. त्यामध्ये विस्तीर्ण भूभागाचे छायाचित्र आणि सेल्फीचा समावेश आहे.
 • मंगळाच्या पृष्ठभागावरील माती, वातावरण यांचा अभ्यास करून तेथील प्राचीन जीवनाच्या खाणाखुणांचा अभ्यास या रोव्हरद्वारे चीन करणार आहे. 

झुरोंग मंगळावर काय करणार?

 1. या रोव्हरचा कार्यकाळ मंगळावरील सुमारे 90 दिवस आहेत.
 2. पाणी व बर्फाचे अस्तित्व शोधणे.
 3. मंगळाच्या पृष्ठभागावरील विद्युत चुंबकीय बलाचे अध्ययन करणे.
 4. मंगळाच्या पृष्ठभागाचे त्रिमितीय छायाचित्र घेणे.
 5. तेथील मातीतील खनिजांचे अध्ययन करणे.
 • दरम्यान नव्या अवकाश स्थानकासाठी आवश्यक उपकरणे व वस्तू वाहून नेणारे ‘तिआनझु-2’ या अवकाश यानाचे उड्डाण तांत्रिक कारणामुळे पुढे ढकलण्याची घोषणा चीनने केली.
 • झुरोंग रोव्हर संदर्भात मंगळावर पाठवलेला रेडिओ मेसेज पृथ्वीवर पोहोचायला 18 मिनिटे लागतात. त्यामुळे हा कालावधी लक्षात घेता तंत्रज्ञांना लँडिंग करावे लागले. 
 • मंगळावरचा एक दिवस 24 तास आणि 39 मिनिटांचा असतो.
 • अमेरिकेच्या अवकाश संशोधन संस्थेने (नासा) झुरोंग रोव्हरने काढलेल्या छायाचित्रांचे कौतुक केले आहे. नासाचे प्रशिक्षक बिल नेल्सन यांनी संस्थेच्या संकेतस्थळावर ‘सीएनएसए’चे अभिनंदन केले आहे.
 • झुरोंगमुळे मंगळाबाबत जास्त माहिती मिळू शकेल. भविष्यातील आंतरराष्ट्रीय शोधातून या ग्रहावर मानवाला उतरविण्यासाठी मदत होऊन त्यादृष्टीने तयारी करणे शक्य होईल अशी आशा मला वाटत असल्याचे नेल्सन यांनी सांगितले.
 • झुरोंग हे चीनच्या पुराणांमधल्या अग्नीचे व युद्ध देवतेचे नाव आहे.

Contact Us

  Enquire Now