चीनचे लाँग मार्च 5 बी प्रक्षेपक हिंदी महासागरात कोसळले
- पृथ्वीच्या कक्षेबाहेर सोडण्यात आलेले चीनचे सर्वांत मोठे लाँग मार्च 5 बी प्रक्षेपक जळालेल्या अवस्थेत मालदीवनजीक हिंदी महासागरात कोसळले.
- चीनचा प्रक्षेपक पृथ्वीकडे परत येत असताना त्याचा विस्फोट होऊन तुकडे झाले. हे तुकडे हिंदी महासागरात कोसळल्याने हे तुकडे कोठे कोसळणार या तर्कवितर्क प्रश्नांना पूर्णविराम मिळाला आहे.
- चीन अवकाश स्थानक उभारत आहे, त्याचाच कोअर मॉड्यूल घेऊन लाँग मार्च 5 बी प्रक्षेपण करण्यात आले होते.
- अग्निबाण पृथ्वीच्या कक्षेबाहेर गेल्याने प्रक्षेपकावरील नियंत्रण सुटल्याने ते प्रक्षेपक पृथ्वीच्या दिशेने येत त्या प्रक्षेपकाने पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केला.
- प्रक्षेपकाची लांबी 100 फूट, 21 टन वजनाच्या प्रक्षेपकाचा हवेशी घर्षण झाल्याने त्याचे तुकडे होऊन 72.47 पूर्व रेखांश आणि 2.65 उत्तर अक्षांशावर हिंदी महासागरात कोसळला.
- कोणत्याही प्रकारचे नुकसान झालेले नाही, पण अमेरिका व युरोपातील अवकाश संशोधन संस्थांनी चीनच्या बेजबाबदपणावर टीका केली आहे.
लाँग मार्च 5 बी
- पृथ्वीकडे येतानाचा वेग – 24000 किमी/तास
- कोसळतानाचा वेग – 8 किमी/सेकंद
- लाँग मार्च प्रक्षेपकाचे वजन – 21 टन
कोअर मॉड्यूल अवकाशात
- लाँग मार्च 5 बी प्रक्षेपकाने घेऊन गेलेले कोअर मॉड्यूल अजून अवकाशातच आहे.
- कोअर मॉड्यूल 18 वजनाचे आहे.
- गेल्या वर्षी चीनच्या पहिल्या लाँग मार्च 5 बी प्रक्षेपकाचे तुकडे आयवरी कोस्ट येथे कोसळले होते.
- अमेरिेकची स्कायलॅब 1979 मध्ये ऑस्ट्रेलियात कोसळली होती.
- आता पृथ्वीवर कोसळलेली सहाव्या क्रमांकाची मानवनिर्मित वस्तू आहे.