चिली देश नवीन संविधान बनवणार
- हवामान आणि पारिस्थितिकीय आणीबाणीला तोंड देण्यासाठी चिली देश नवीन संविधान बनवणार आहे.
- नवीन संविधान लिथियम खाण आणि त्याचे नियमन यावर लक्ष केंद्रित करेल. याशिवाय, लिथियम खाणकामामुळे स्थानिक समुदायांना कसा फायदा होतो हेही पाहिलं जाईल. नवीन राज्यघटनेचे शिल्पकार चिलीच्या राजकीय व्यवस्थेला सुधारणेची गरज आहे की नाही याचे देखील मूल्यांकन करतील.
- चिलीमध्ये लिथियमचे अत्यंत समृद्ध साठे असून चिली देश ऑस्ट्रेलिया नंतरचा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा लिथियम उत्पादक देश आहे.
- लिथियम हा जवळपास सर्व स्मार्ट उपकरणांच्या बॅटरीचा भाग असल्याने त्याची मागणी अतिशय जास्त आहे. संपूर्ण जग सध्या जीवाशम इंधनाला पर्याय शोधत आहे या पार्श्वभूमीवर लिथियमच्या असणारी उच्च मागणीमुळे त्याच्या दरांमध्ये ही वाढ होत आहे.
- चिलीच्या राजकारण्यांना देशाला अधिक श्रीमंत करण्यासाठी त्याच्या लिथियमचा फायदा घ्यायचा आहे.
- लष्करी शासक ऑगस्टो पिनोशेच्या नेतृत्वाखाली चिलीने त्यांच्या संसाधनांच्या वापराचा प्रवास सुरू केला.
- लिथियमच्या उत्खननामुळे जमिनीतील ओलावा कमी होतो आणि दिवसाचे तापमान वाढते ज्यामुळे तो प्रदेश कोरडा होतो. लिथियमच्या अधिकच्या उत्खननामुळे मानवी आरोग्यावर त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो.
- अनेकांना भीती वाटते की नवीन घटनेमुळे खाणकामावर प्रचंड रॉयल्टी आणि निर्बंध लादले जातील.
- चिलीची नवीन राज्यघटना लिहिण्याचे कार्य हवामान आपत्तींकडे वाटचाल करणाऱ्या जगामध्ये बदलत्या प्राधान्यांची आठवण करून देणारे आहे.