चिनी ‘कृत्रिम सूर्य’ प्रायोगिक अणुभट्टीद्वारे नवीन विश्वविक्रम
-
- चीनच्या प्रायोगिक प्रगत सुपरकंडक्टिंग टोकामॅकने २८८ दशलक्ष डिग्री फॅरेनहाइटचे सर्वोच्च तापमान गाठले, जे सूर्यापेक्षा १० पट गरम आहे.
- यापूर्वी दक्षिण कोरियाच्या KSTAR (कोरिया सुपरकंडक्टिंग टोकामॅक प्रगत संशोधन) अणुभट्टीने २०२० मध्ये २० सेकंदांसाठी १०० दशलक्ष डिग्री प्लाझा तापमान गाठले होते.
प्रायोगिक प्रगत सुपरकंडक्टिंग टोकामॅक : (Experimental Advanced Superconducting Tokamak – EAST)
- हे प्रयोगात्मक मशीन सूर्याच्या ऊर्जा निर्मितीच्या प्रक्रियेची नकल करते, म्हणून त्याला ‘कृत्रिम सूर्य’ असेही म्हटले जाते.
- हे चीनमधील हेफेई अणुभट्टीमध्ये केंद्रीय सम्मीलनाद्वारे ऊर्जा निर्मिती करणारे प्रयोगात्मक संशोधन उपकरण आहे.
- EAST प्रकल्प हा आंतरराष्ट्रीय थर्मोन्यूक्लियर एक्सपरिमेंटल रिॲक्टर (आयटीईआर) सुविधेचा एक भाग असून २०३५ मध्ये कार्यरत झाल्यानंतर जगातील सर्वात मोठी केंद्रीय संम्मिलन अणुभट्टी होईल.
- या आयटीइआर प्रकल्पांतर्गत भारत, दक्षिण कोरिया, जपान, रशिया आणि अमेरिका या सदस्य देशांचा समावेश होतो.
कार्य :
- हे टोकामॅक सूर्य आणि ताऱ्यांद्वारे घडून येणाऱ्या केंद्रीय संम्मिलन प्रक्रियेवर आधारित आहे.
- हायड्रोजन अणूवर प्रचंड दाब आणि उष्णता निर्माण केली जाते. हायड्रोजनच्या केंद्रकातील ड्युटेरियम आणि ट्रिटियम हे एकत्र आल्यानंतर हेलियम आणि एक न्यूट्रॉन संपूर्ण ऊर्जेने बाहेर उत्सर्जित होतात.
- वायूस्वरूपातील हायड्रोजन इंधनाला १५० दशलक्ष अंश सेल्सियस तापमानापर्यंत उष्णता दिली जाते, ज्यापासून सबअॉटोमिक कणांच्या उष्ण प्लाझ्माची (विद्युतप्रभारित वायू) निर्मिती होते.
- मजबूत चुंबकीय क्षेत्राच्या मदतीने प्लाझ्मा अणुभट्टीच्या भिंतीपासून लांब ठेवला जातो जेणेकरून ते थंड होऊ नये तसेच त्याची उष्णता निर्माण करण्याची शक्ती कमी होऊ नये.
महत्त्व
- हरित चीनच्या विकासासाठी महत्त्वाचे.
- न्यूक्लिअर फ्यूजन (केंद्रीय संम्मिलनाद्वारे) अधिक कचरा न करता उच्च पातळीची ऊर्जा निर्माण केली जाते.
- केंद्रीय संम्मिलनाच्या प्रक्रियेमधून हरितगृह वायूंचे उत्सर्जन होत नाही तसेच ही अतिशय सुरक्षित व कमी अपघाती प्रक्रिया मानली जाते.
चीनमधील इतर टोकामॅक्स
- EAST व्यतिरिक्त चीनमध्ये एचएल – २ए तसेच जे- टेक्ट (J- TEXT) कार्यरत आहेत.
- डिसेंबर २०२०मध्ये एचएल-२एम टोकामॅक हे चीनमधील सगळ्यात मोठे व अधिक प्रगत केंद्रीय संम्मिलन प्रायोगिक संशोधन उपकरण ठरले, ज्याने चीनच्या आण्विक शक्ती संशोधन क्षमतेत भर घातली.