घोटाळेग्रस्त बँकांच्या खातेदारांना पाच लाखांपर्यंत ठेवी परत
- घोटाळेग्रस्त पंजाब ॲण्ड महाराष्ट्र (पीएमसी), रूपी, कपोल, मराठा सहकारी बँकेसारख्या देशभरातील एकूण २१ बँकांच्या ठेवीदारांना त्यांच्या खात्यातून पाच लाखापर्यंतची रक्कम परत मिळणार.
- बँकांच्या ठेवीदारांना सर्व प्रकारच्या खात्यांमध्ये शिल्लक व व्याजासह मिळून जमा असलेल्या एकूण रकमेपैकी कमाल पाच लाख रुपयांपर्यंतची ठेव रक्कम परत मिळेल.
- डिपॉझिट इन्शुरन्स ॲण्ड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनने (डीआयसीजीसी) २१ बॅकांची यादी जाहीर केली असून, ९० दिवसांत पाच लाखांपर्यंतच्या ठेवी मिळण्यास पात्र असणाऱ्या ठेवीदारांची यादी तयार करण्यात आली आहे.
- ठेव विमा आणि पत हमी महामंडळ विधेयक, २०२१ संसदेत मंजूर केल्याने या कायद्यान्वये आर्थिक संकटात सापडलेल्या एखाद्या बॅकेंवर रिझर्व्ह बँकेने निर्बंध लागू केल्यास त्या बँकेच्या ठेवीदारांना एकूण रकमेपैकी कमाल पाच लाख रुपयांपर्यंतची रक्कम निर्बंध लागू केल्यापासून ९० दिवसांत परत मिळेल.
२१ बँकांपैकी महाराष्ट्रातील ११ बँकांचा समावेश आहे.
१) पंजाब ॲण्ड महाराष्ट्र (पीएमसी)
२) सहकारी बँक
३) रूपी सहकारी बँक
४) सिटी को-ऑपरेटिव्ह बँक
५) मराठा सहकारी बँक
६) कपोल को- ऑपरेटिव्ह बँक
७) नीड्स ऑफ लाईफ को-ऑपरेटिव्ह बँक
८) पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखेपाटील सहकारी बँक
९) श्री आनंद को-ऑपरेटिव्ह बँक लि. पुणे
१०) मंथा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक
११) सर्जेरावदादा नाईक शिराळा सहकारी बँक