ग्लोबल फॉरेस्ट रिसोर्स असेसमेंट अहवाल
- अन्न व कृषी संघटनेच्या (FAO) ग्लोबल फॉरेस्ट रिसोअर्स असेसमेंट,२०२० या अहवालानुसार जंगलांच्या क्षेत्रफळ वाढीत भारताचा जगात तिसरा क्रमांक आला आहे.
- या यादीत चीनचा प्रथम तर ऑस्ट्रेलियाचा दुसरा क्रमांक लागतो. गेल्या १० वर्षांत भारताने ०.३८% वार्षिक जंगलवाढ नोंदवली आहे.
- जगातील एकूण भूभागापैकी ३१% (४.०६ बिलियन हेक्टर) भूभाग जंगलांनी व्यापलेला आहे. रशियामध्ये जगातील सर्वाधिक २०% जंगले आहेत. त्यानंतर खालोखाल ब्राझील आणि कॅनडा या देशांमध्ये अनुक्रमे १२% व ९% जंगले आहेत.
- वनक्षेत्रात जगभरातील १२.५ मिलियन लोकांना रोजगार मिळाल्याचेही अहवालात म्हटले आहे. या लोकांपैकी ६.२३ मिलियन लोकांना भारतात रोजगार मिळाले असून भारत या यादीत प्रथम आलेला आहे.
- तसेच १९९० पासून २०१९ पर्यंत जगभरात १७८ मिलियन हेक्टर जंगले नामशेष झाल्याचेही अहवालात स्पष्ट केले आहे. आफ्रिका खंडात सर्वात जास्त जंगले दरवर्षी नामशेष होत असल्याचे समजते. तसेच आशिया खंडाने उत्तम कामगिरी करत सर्वात जास्त संवर्धन केले आहे.
Food And Agriculture Organisation बद्दल:
१) मुख्यालय : रोम, इटली
२) डायरेक्टर जनरल : क्यू दोंग्यू