ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स (GIT) २०२० नुसार ४८वा
- जागतिक बौद्धिक (संपत्ती) मालमत्ता संघटनेने (WIPO) कॉर्नेल विद्यापीठ, INSEAD बिझिनेस स्कूल यांच्यासह संयुक्तपणे जाहीर केलेल्या अहवालात ३५.५९ गुणांसह भारत ४८व्या स्थानावर आहे.
- ग्लाोबल इनोव्हेशेन इंडेक्सच्या १३व्या आवृत्तीत भारत प्रथमच ५०च्या आत आहे. (Theme – Who will Finance Innovation)
प्रथम क्रमांक गुण
१ – स्वित्झर्लंड ६६.०८
२ – स्विडन ६२.४७
३ – अमेरिका ६०.५६
४ – इंग्लंड ५९.७८
- या क्रमवारीसाठी एकूण १३१ देशांचे विश्लेषण केले.
- भारताचा २०१५ मध्ये ८१ वे २०१९ मध्ये ५२ वे स्थान होते.
- GII निर्देशांकामध्ये संस्था, मानवी भांडवल, संशोधन, पायाभूत सुविधा, ज्ञान-तंत्रज्ञान उत्पादन इ. चा समावेश आहे.
GII नुसार ३ वर्गवारी –
१) उच्च उत्पन्न देश
२) मध्यम उत्पन्न देश
३) कमी उत्पन्न देश
- मध्यम उत्पन्न देशांच्या वर्गवारीत प्रथम – व्हिएतनाम द्वितीय – युक्रेन तृतीय – भारत
- माहिती व दळणवळण तंत्रज्ञान सेवा निर्यात (ICT) शासकीय ऑनलाईन सेवा, विज्ञान व अभियांत्रिकी पदवीधर व संशोधन व विकास गहन यासारख्या ग्लोबल कंपन्यांच्या निर्देशांकात भारत १५वा आहे.
- WIPO – जागतिक बौद्धिक संपत्ती संघटना World Intellectual Property organisation
- बौद्धिक मालमत्ता धोरण, सेवा माहिती आणि सहकार्याचे जागतिक मंच
- संयुक्त राष्ट्राची १ खास एजन्सी त्याचे १९३ देश सदस्य
- मुख्यालय – जिनिव्हा
- महानिर्देशक – डॅरेन एंग (सिंगापूर)
World University Ranking – २०२१
- वर्ल्ड युनिव्हर्सिटी रॅकिंग २०२१ मध्ये IISc बेंगळूूरू – ६३व्या स्थानी
- २ सप्टेंबर २०२० रोजी, इंग्लंडमधील टाइम्स हायर एज्युकेशनने वर्ल्ड युनिव्हर्सिटी रॅकिंग २०२१ जाहीर केले. त्यात एकूण ४०० विद्यापीठांपैकी भारताचे फक्त Indian Institute of Science बंगळूरू ६३वे स्थान पटकावू शकले.
- या यादीत इंग्लंडचे ऑक्सफर्ड विद्यापीठ अव्वल स्थानी आहे.
- द्वितीय – स्टॅनफोर्ड विद्यापीठ, कॉलिफोर्निया, अमेरिका
- तृतीय – टार्वर्ड विद्यापीठ, मॅसॅच्युसेट्स, अमेरिका
- हे रॅकिंग १३ कार्यक्षमता निर्देशांकांवर आधारित आहे. जे शिक्षण, संशोधन, ज्ञान हस्तांतण व आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन या ४ क्षेत्रांमध्ये संस्थेचे कामकाज मोजतात.
- या रॅकिंगमध्ये ९३ देशांतील १५०० विद्यापीठांचा समावेश होता.
- पहिल्या २०० रँकमध्ये अमेरिकेची (५९), इंग्लंडची (२९) जर्मनीची (२१) विद्यापीठे आहेत.
- प्रक्रियेच्या पारनेदर्शकतेमुळे भारताच्या IIT २०२० च्या क्रमवारीवर बहिष्कार टाकला. आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन व संशोधन पत्रिकेच्या उद्धरणाच्या प्रभावांनुसार भारतीय संस्था कमी गणल्या जातात.
- टाइम्स हायर एज्युकेशनच्या २०२० रॅकिंगच्या दुसर्या आवृत्तीमध्ये IIT खरगपूर ५७ वे क्रमांकावर व ऑकलंड विद्यापीठ (न्यूझीलंड) प्रथम क्रमांकावर आहे.
- टाइम्स हायर एज्युकेशन (आशिया) च्या जून २०२० रॅकिंगमध्ये भारत हा तिसर्या क्रमांकाचा देश ठरला. (ज्याची सर्वाधिक विद्यापीठे रॅकिंगमध्ये आहेत.)