ग्रामोद्योग विकास योजनेंतर्गत नवीन कार्यक्रम

ग्रामोद्योग विकास योजनेंतर्गत नवीन कार्यक्रम

    • सूक्ष्म, लघू आणि मध्यम उपक्रम मंत्रालयाने अगरबत्ती उत्पादन निगडित असणार्‍या कामगारांसाठी ग्रामोद्योग विकास कार्यक्रम अंतर्गत एका कार्यक्रमास मंजुरी दिली.
    • त्यानुसार सुरुवातीला चार मुख्य प्रकल्प सुरू करण्यात येतील. (त्यातील एक ईशान्य भारतात असणे आवश्यक)
    • खादी व ग्रामोद्योग आयोग (KVIC) या कामगारांना प्रशिक्षण, कच्चा माल तसेच इतर मदत करेल.
    • ग्रामीण भागातील अगरबत्ती व्यवसायाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी तसेच पारंपरिक उद्योगात असणार्‍या कामगारांना कायमस्वरूपी रोजगार मिळवून देणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. तसेच अगरबत्तीची आयात कमी करण्यात देखील यामुळे सहाय्य लाभणार आहे.
    • भारत सरकारने अगरबत्ती आयातीवर वेगवेगळे निर्बंध याआधीच घातले असून अगरबत्ती बनविण्यास लागणार्‍या कच्च्या मालावर आयात शुल्क १० ते २५% पर्यंत वाढवले आहे.

 

  • ग्रामोद्योग विकास योजना

 

    • खादी ग्रामोद्योग विकास योजनेच्या दोन घटकांपैकी हा एक घटक असून त्याद्वारे ग्रामीण उद्योगांना विविध सुविधा, तांत्रिक सहाय्य, प्रशिक्षण देऊन या उद्योगांचा विकास घडवला जातो.

 

  • खादी व ग्रामोद्योग आयोग (KVIC)

 

  • (Khadi and Village Industries Commission)
  • ही एक वैधानिक संस्था असून स्थापना खादी व ग्रामोद्योग आयोग कायदा १९५६ अंतर्गत करण्यात आली आहे.
  • या आयोगामार्फत ग्रामीण भागातील उद्योगांना मदत केली जाते.

Contact Us

    Enquire Now