गोव्याच्या तीन उत्पादनांना GI मानांकन
- गोव्यातील मोइरा केळी, हर्माल मिरची, खाजे या अन्नपदार्थाला GI मानांकन जाहीर करण्यात आले.
भौगोलिक मानांकन (GI) टॅग
- हा निर्देश विशिष्ट उत्पादनांवर वापरला जातो. त्यावरून त्या पदार्थाला एखाद्या विशिष्ट भूप्रदेश किंवा त्याच्या मूळच्या स्थानाशी जोडण्यात येते.
- बौद्धिक मालमत्ता हक्कांच्या व्यापाराशी संबंधित असणार्या TRIPS करारातील कलम २२(१) मध्ये भौगोलिक मानांकनाची व्याख्या करण्यात आली आहे.
- या कराराचा एक भाग म्हणून भारताने भौगोलिक मानांकन (नोंदणी व संरक्षण), १९९९ हा अधिनियम केला. तो १५ सप्टेंबर २००३ पासून अंमलात आला.
- GI टॅगने हे सुनिश्चित केले जाते की अधिकृत वापरकर्ते म्हणून नोंद असणार्या व्यतिरिक्त इतरांद्वारे उत्पादन घेतले जाणार आहे.
- दार्जिलिंग चहाला २००४-०५ मध्ये सर्वात प्रथम हा दर्जा देण्यात आला.
GI चे ब्रीद वाक्य – अतुल्य भारत की अमूल्य निधी