गोवा बनले भारतातील प्रथम ‘हर घर जल’ राज्य

गोवा बनले भारतातील प्रथम ‘हर घर जल’ राज्य

    • केंद्रीय ‘जल जीवन मिशन’ (JJM) अंतर्गत गोव्यातील सुमारे 2.30 लाख घरांना चालू घरगुती नळ जोडणी (FHTC) नुसार 100% नळ कनेक्शन दिले गेले.
    • वेळेअगोदरच गोवा राज्याने हे लक्ष्य गाठले आहे. (लक्ष्य वर्ष 2021 होते.)
    • उत्तर गोव्यात 1 लाख 65 हजार व दक्षिण गोव्यात 98000 ग्रामीण घरे आहेत व गोव्यात एकूण 191 ग्रामपंचायती आहे. या या सर्व ठिकाणी नळाचे कनेक्शन दिले गेले.

 

  • जल जीवन मिशन –

 

  • उद्देश – 2024 पर्यंत 18 कोटी ग्रामीण घरांना चालू घरगुती नळ कनेक्शन (FHTC) करून देणे.
  • प्रत्येक खेड्यातील किमान 5 जणांना विशेषत: महिलांना प्रशिक्षण देणे जेणेकरून खेड्यांतच फील्ड टेस्ट किट वापरून पाण्याची चाचणी घेता येईल.
  • जुलै 2020 मध्ये केंद्रीय सरकारने जलशक्‍ती मंत्रालयाच्या वार्षिक कृती योजनेच्या आधाराने गोवा राज्यासाठी आर्थिक वर्ष 20-21 साठी 12.40 कोटी निधी मान्य केला.

 

भारतीय अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण (FSSAI) नी 2019-20 साठी दुसरा राज्य अन्न सुरक्षा निर्देशांक (SFSI) मांडला. त्यात मोठ्या राज्यांपैकी गुजरात व छोट्या राज्यांपैकी गोवा प्रथम क्रमांकावर आहेत. 7 जून 2020 (जागतिक खाद्य सुरक्षा दिन) रोजी याची घोषणा करण्यात आली.

Contact Us

    Enquire Now