गोलंदाज राजिंदर गोयल यांचे निधन
- रणजी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक बळी टिपणारे लेग स्पिनर राजिंदर गोयल यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते.
- गोयल यांनी रणजी क्रिकेट स्पर्धेत ६३७ बळी मिळवले. आतापर्यंत इतर कोणत्याही खेळाडूला ६०० बळी मिळवता आले नाहीत, पण त्यांना भारतीय संघात स्थान मिळू शकले नाही.
- हरियाणाच्या गोयल यांनी १५७ सामने खेळले असून ५५ धावांत ८ बळी ही त्यांची सर्वोत्तम खेळी होती.
- गोयल यांनी रणजीच्या एका हंगामात २५ पेक्षा अधिक बळी १५ वेळा मिळवले आहेत. त्यावेळी ५९ वेळा एका डावात ५ बळी तर १८ वेळा एका सामन्यात १० बळी मिळवले आहेत.
- गोयल यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सामनाधिकारी म्हणून काम पाहिले आहे.
- गोयल यांना २०१२ मध्ये बीसीसीआयच्या जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.