गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना

  • शेती व्यवसाय करताना होणारे अपघात, वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचू दंश, विजेचा धक्का बसणे आदी नैसर्गिक आपत्तींमुळे होणारे अपघात. रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात तसेच अन्य कोणत्याही कारणाने होणारे अपघात, यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना मृत्यू किंवा अपंगत्व येते अशा अपघातग्रस्त शेतकरी/त्यांच्या कुटुंबास आर्थिक लाभ देण्याकरिता
  • पात्रता – राज्यातील १० ते ७५ वयोगटातील महसूल नोंदीनुसार विमा पॉलिसी लागू झालेल्या तारखेस खातेदार असलेला शेतकरी व त्यांच्या कुटुंबातील वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेला कोणताही एक सदस्य असे १० ते ७५ वर्षे वयोगटातील एकूण दोन जण
  • सर्व शेतकऱ्यांची विमा हप्त्याची रक्कम शासन विमा कंपनीस भरते.
अपघाताचे स्वरूप आर्थिक मदत
१) अपघाती मृत्यू किंवा अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन हात किंवा दोन पाय तसेच एक डोळा व एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास २ लाख रुपये
२) अपघातामुळे एक डोळा अथवा एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास १ लाख रुपये

Contact Us

    Enquire Now