गैर-बँकांना सीपीएसमध्ये सहभागी होण्यास आरबीआयची परवानगी
- अलिकडेच, भारतीय रिझर्व्ह बँकेने नॉन-बँक पेमेंट सिस्टिम प्रोव्हाइडर्सला (PSPs) सेंट्रलाइज्ड पेमेंट सिस्टिम (CPS- RTGS आणि NEFT) मध्ये प्रत्यक्ष सदस्य म्हणून सहभागी होण्याची परवानगी दिली.
ठळक मुद्दे
अ) टप्प्याटप्प्याने मान्यता :
पहिल्या टप्प्यात प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट्स (PPI), कार्ड नेटवर्क आणि व्हाईट लेबल एटीएम (WLA) ऑपरेटर यांसारख्या पीएसपींना प्रवेश दिला जाईल.
ब) गैर-बँकांसाठी स्वतंत्र आयएएफसी :
याचा अर्थ गैर बँकांना स्वतंत्र इंडियन फायनान्शियल सिस्टिम कोडचे वाटप करणे, RBI मध्ये त्याच्या मूळ बँकिंग प्रणालीमध्ये (इ-कुबेर) चालू खाते उघडणे, तसेच RBI मधील सेंटलमेंट खाते चालवणे.
- कोअर बँकिंग सिस्टिम हा असा उपाय आहे जो बँकांना २४ × ७ आधारावर ग्राहक – केंद्रित सेवा प्रदान करण्यास सक्षम करते.
- ज्यात भारतीय वित्तीय नेटवर्क (INFINET)चे सदस्यत्व आणि सीपीएसशी संवाद साधण्यासाठी स्ट्रक्चर्ड फायनान्शियल मेसेजिंग सिस्टिम (एसएफएमएस) चा वापर याचा समावेश होतो.
- INFINET सदस्यत्व : क्लोज्ड यूजर ग्रुप नेटवर्क असून त्यात रिझर्व्ह बँक, सदस्य बँका आणि वित्तीय संस्थांचा समावेश होतो.
- SFMS : आंतरबँक वित्तीय संदेश आणि सीपीएससाठीचा कणा.
महत्त्व :
अ) पेमेंट परिसंस्थेचा धोका कमी करणे.
ब) पेमेंटची किंमत कमी करणे.
क) निधीच्या अंमलबजावणीतील अपयश किंवा विलंब कमी करणे.
ड) कार्यक्षमता वाढविणे व चांगले जोखीम व्यवस्थापन
केंद्रीकृत आणि विकेंद्रीकृत पेमेंट प्रणाली :
अ) केंद्रीकृत पेमेंट प्रणाली :
- रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट (RTGS) आणि नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड (NEFT) प्रणालीचा समावेश होतो. जे आरबीआयच्या मालकीचे आणि संचालित आहेत.
मापदंड | RTGS (२००४) | NEFT (२००५) |
वापर | मोठ्या रकमांच्या हस्तांतरणासाठी | लहान ते मोठ्या रकमांच्या हस्तांतरणासाठी |
किमान हस्तांतरण | २ लाख रु. | मर्यादा नाही. |
कमाल हस्तांतरण | मर्यादा नाही | मर्यादा नाही. |
ब) विकेंद्रीकृत पेमेंट प्रणाली:
- आरबीआय (Cheque Truncation System – CTS) तसेच इतर बँका (Express Cheque Clearing System Centres – ECCS) आणि वेळोवेळी आरबीआयने ठरवलेल्या कोणत्याही प्रणालीद्वारे व्यवस्थापित निरसन गृहाचा समावेश असेल.
- इ – कुबेर :
एका बँक खात्यातील अतिरिक्त शिल्लक ही कमी शिल्लक असलेल्या दुसऱ्या खात्यात इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पोहोचविण्यासाठी रिझर्व्ह बँकेने २०१२मध्ये सुरू केलेली प्रणाली.