गुजरात, अंदमान-निकोबार स्टार्ट अप्ससाठी सर्वोत्तम
- ११ सप्टेंबर २०२० रोजी उद्योग व अंतर्गत व्यापार संवर्धन विभागाने (DPIIT) ‘स्टेट्स ऑन सपोर्ट टू स्टार्टअप इकोसिस्टिम २०१९ ची दुसरी आवृत्ती प्रकाशित केली.
- श्रेणी X मधील गुजरात राज्य अव्वल (श्रेणी x पूर्वेतर राज्ये व केंद्रशासित प्रदेश वगळता उर्वरित भारत)
- श्रेणी y मधील अंदमान-निकोबार अव्वल
- (श्रेणी y – आसामशिवाय पूर्वेतर राज्य व दिल्लीशिवाय इतर केंद्रशासित प्रदेश)
- केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियुष गोयल यांनी ही क्रमवारी जाहीर केली.
श्रेणी x मधील इतर राज्ये व त्यांचे स्थान
१) बिहार, महाराष्ट्र, ओदिशा, राजस्थान, लीडर वर्गवारीत
२) हरियाणा, झारखंड, पंजाब – उगवते लीडर वर्गवारीत
३) आंध्रप्रदेश, छत्तीसगढ, मध्यप्रदेश – इमर्जिंग स्टार्ट अप्स इकोसिस्टिम
श्रेणी y मधील इतर राज्ये व त्यांचे स्थान
१) नागालँड, उगवते लीडर वर्गवारीत
२) मिझोराम, सिक्कीम – इमर्जिंग स्टार्ट अप इकोसिस्टिममध्ये
- सर्व सहभागी राज्यांच्या व केंद्रशासित प्रदेशांचा राष्ट्रीय व राज्य विशिष्ट अहवालही प्रदर्शित करण्यात आला आहे.
- स्टार्ट अप्सना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने जानेवारी २०१६ मध्ये ‘स्टार्ट अप इंडिया अॅक्शन प्लॉन’ सुरू केला.
- उद्योग व अंतर्गत व्यापार संवर्धन विभागाने ‘इंडिया इन्व्हेस्टमेंट ग्रिड तयार केले आहे. जे परदेशी गुंतवणूकदारांना गुंतवणुकीसाठी क्षेत्रे, राज्ये, प्रकल्पांची माहिती देणारे पोर्टल आहे.
- २५ जून २०२० रोजी ‘ग्लोबल स्टार्ट अप इकोसिस्टिम रिपोर्ट (GSER) २०२०’ या अहवालानुसार बंगळूरू हे भारतातील एकमेव शहर ३० शहरांच्या यादीत २६ वे स्थानावर आहे.
- DPIIT (Department of Promotion of Industry and Internal Trade) (उद्योग व अंतर्गत व्यापार संवर्धन विभाग)
- वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत केंद्र सरकारचा विभाग
- सचिव – गुुरुप्रसाद महापागा