
गिरीश ठाकुरलाल नानावटी
जन्म – १७ फेब्रुवारी १९३५, जंबसुर (गुजरात)
निधन – १८ डिसेंबर २०२१, (अहमदाबाद)
जीवनपरिचय
- भडोचजवळच्या जंबसुर या गावात जन्मलेले, त्याच परिसरात मॅट्रिकचे शिक्षण पूर्ण केले.
- गिरीश नानावटी कायद्याच्या शिक्षणासाठी मुंबईला आले आणि सहाच वर्षांत १९५८ पासून मुंबई उच्च न्यायालयात वकिली करू लागले.
- १९७९ पर्यंत मुंबईतच राहून वकिली केली.
- तीन दशके ते न्यायाधीश, न्यायमूर्ती होते, त्याहीपेक्षा ते नानावटी आयोगाशी जोडले होते.
- १९७९ मध्ये ते गुजरात उच्च न्यायालयात न्यायाधीशपदी त्यांची नियुक्ती झाली.
- १९९३ मध्ये गुजरातमधून ओदिशा उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीशपदी नेमणूक; पण लगेच एका वर्षाच्या आतच त्यांची बदली त्याच पदावर पण आव्हानात्मक मानल्या जाणाऱ्या कर्नाटक उच्च न्यायालयात झाली.
- १९९५ ते २००० निवृत्तीपर्यंत ते सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तीपदी होते.
- १९९४ च्या शीखविरोधी दिल्ली दंगलीची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयातील निवृत्त न्यायमूर्तीचा एक सदस्य आयोग यात नानावटींची नियुक्ती केली होती.
- २००२ मध्ये गुजरातमधील दंगलीची चौकशी करणाऱ्या त्रिसदस्यीय आयोगावरही त्यांची नियुक्ती तत्कालीन मुख्यमंत्री मोदी यांनी केली होती.