गिरमधील सिंहांची संख्या वाढली
- गुजरात वनविभागाने केलेल्या पूणम अवलोकन सर्वेक्षणानुसार गिर अभयारण्यातील सिंहाच्या संख्येत २९% वाढ झाल्याचे म्हटले आहे.
- २०१५ मध्ये गिरमध्ये ५२३ सिंह होते तर नवीन सर्वेक्षणानुसार ६७४ सिंह आहेत. सिंहाचा वावर असलेल्या क्षेत्रफळाचीही ३६% वाढ झाली आहे.(२०१५ : २२००० चौरस किमी,
- २०२० : ३०००० चौरस किमी)
- आशियाई सिंह असलेले गिर हे जगातील एकमेव अभयारण्य आहे. १९६५ साली या प्रदेशाला अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले. गुजरातमधील सौराष्ट्र भागातील नऊ जिल्ह्यांमध्ये हे अभयारण्य विस्तारलेले असून जुनागड जिल्ह्यात याची सुरुवात होते.
- संख्येत वाढ झालेली असली तरी Canine Distemper Virus (CDV) आणि आपसातील युद्धामुळे गेल्या जानेवारी महिन्यापासून ९२ सिंह मृत्युमुखी पडले आहेत.