गांधी जयंती आणि भारतातील स्वच्छतेचा आढावा
- एक ऑक्टोबरला मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत मिशन (शहरी) तसेच अमृत योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला हिरवा झेंडा दाखवला.
- २ ऑक्टोबरला गांधी जयंतीच्या निमित्ताने त्यांनी ‘जल जीवन मिशन’ या मोबाईल ॲपचे आणि राष्ट्रीय जल जीवन कोश यांचे अनावरण केले.
- स्वच्छ भारत अभियान (शहरी) च्या दुसऱ्या टप्प्या अगोदर स्वच्छ भारत मिशनबद्दल आपण माहिती घेऊ.
स्वच्छ भारत अभियान :
- योजनेचा विकास आणि पार्श्वभूमी :
- १९८६ : केंद्रीय ग्रामीण स्वच्छता कार्यक्रम – ग्रामीण लोकांच्या राहणीमानात आणि स्वच्छतेत सुधारणा करण्यासाठी तसेच स्त्रियांना एकांत (privacy) व आदर (dignity) मिळण्यासाठी
- १९९९ : संपूर्ण स्वच्छता अभियान – वरील केंद्रीय ग्रामीण स्वच्छता कार्यक्रमाची पुनर्रचना करून मागणी आधारित,सामुदायिक सहभाग आणि लोककेंद्रित असणारा हा कार्यक्रम २०१२ अखेर ग्रामीण भागातील सर्वांना स्वच्छतेच्या सुविधा पोहोचविण्याच्या उद्दिष्टाने सुरू करण्यात आला. नंतर हे लक्ष्य २०१७ पर्यंत पूर्ण करण्यात आले.
- १ एप्रिल २०१२ : निर्मल भारत अभियान – २०२२ पर्यंत ग्रामीण स्वच्छता प्राप्त करण्यासाठी ‘निर्मल भारत’ हे उद्दिष्ट समोर ठेवून वरील संपूर्ण स्वच्छता अभियानाचे रूपांतर निर्मल भारत अभियानात करण्यात आले.
- २ ऑक्टोबर २०१४ : स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) : ग्रामीण भागासाठी असणाऱ्या निर्मल भारत अभियानाची पुनर्रचना करून सदर मिशन सुरू करण्यात आले. याअंतर्गत गांधीजींच्या १५०व्या जयंतीच्या निमित्ताने ‘२०१९ पर्यंत स्वच्छ भारत‘ तसेच सर्व ग्रामपंचायतींना ‘निर्मल दर्जा’ मिळवून देणे ही प्रमुख उद्दिष्टे ठेवण्यात आली. २०१९पर्यंत स्वच्छ भारत म्हणजे ग्रामीण भारताला हागंदारीमुक्त (ODF -Open Defecation Free) करणे.
स्वच्छ भारत मिशन (शहरी) :
- २ ऑक्टोबर २०१४ रोजीच शहरी भागासाठी नवीन असे स्वच्छ भारत मिशन (शहरी) सुरू करण्यात आले. याचे मुख्य उद्दिष्ट देशातील शहरे हागंदारीमुक्त करणे हे आहे.
- देशातील ४५२३ शहरांची निवड या अभियानाची अंमलबजावणी करण्यासाठी झाली आहे.
- मानवी मलनिस्सारण पद्धतीचे (मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग) निर्मूलन करणे, घनकचऱ्याचे शास्त्रीय व्यवस्थापन, स्वच्छतेच्या सवयी लावणे, शहरी स्थानिक संस्थांचे क्षमतावर्धन करणे, वैयक्तिक, सामुदायिक तसेच सार्वजनिक शौचालये उभारणे इत्यादी बाबींचा समावेश या मिशनमध्ये होतो.
- १ ऑक्टोबरला पंतप्रधानांनी सुरू केलेल्या शहरी स्वच्छ भारत मिशनच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये शहरांना पूर्णतः कचरामुक्त करण्याचे तसेच सांडपाणी व्यवस्थापन क्षमता प्राप्त करण्याचे ध्येय ठेवलेले आहे.
- तसेच सर्व शहरी स्थानिक संस्थांना ODF+ दर्जा आणि एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या असणाऱ्या शहरांना ODF++ दर्जा मिळवून देण्याचे उद्दिष्ट या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत नियोजित आहे.
- ODF दर्जा : हागंदारीमुक्त दर्जा प्राप्त करून तसे प्रमाणपत्र मिळणे. यामध्ये शौचालयांची बांधणी हा मुख्य निकष आहे.
- ODF+ दर्जा : शौचालयांची बांधणी तसेच त्यांचा शाश्वत वापर यांची पूर्तता केल्यास हा दर्जा मिळतो.
- ODF++ दर्जा : शौचालयांची बांधणी, त्यांचा शाश्वत वापर, स्वच्छता मूल्य साखळी (Sanitation Value Chain) आणि सुरक्षित मल्यव्यवस्थापन या चार निकषांचा विचार करून हा दर्जा दिला जातो.
- शिवाय सध्या देशांतर्गत निर्माण होणाऱ्या कचऱ्यापैकी ७०टक्के कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. दुसऱ्या टप्प्यांतर्गत हे प्रमाण १०० टक्के केले जाईल.
- २ ऑक्टोबर २०१९ला गांधीजींच्या १५०व्या जयंती निमित्त मा. पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांनी भारताला हागंदारीमुक्त म्हणून घोषित केले.
- २०१४ ते २०१९ दरम्यान चाललेल्या ‘स्वच्छ भारत मिशन’च्या पहिल्या टप्प्यामध्ये एकूण १०.७ कोटी शौचालये बांधली गेली. तसेच ६२.६ लाख वैयक्तिक घरगुती शौचालयांची बांधणी झाली. शिवाय ६.१५ लाख सामुदायिक शौचालये बांधली.