खासगी बँकाच्या मालकी विषयी रिझर्व्ह बँकेची अंतर्गत समिती
- भारतीय रिझर्व्ह बँकेने पी. के. मोहंती यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय अंतर्गत समिती स्थापन केली आहे. खासगी बँकांच्या मालकी आणि नियंत्रणा संदर्भात शिफारसी करण्यासाठी या समितीचे गठन करण्यात आले.
- खासगी बँकांच्या लायसन्स आणि नियंत्रण विषयक सूचनावली साठी शिफारसी करण्यासाठी या समितीचे गठन करण्यात आले. खासगी बँकांची मालकी, प्रवर्तक, होल्डिंग, नियंत्रण आणि मताधिकार इत्यादीविषयीच्या शिफारसी ही समिती करणार आहे. त्याचबरोबर नवीन परवाना देण्यासाठीच्या निकषांच्या निश्चितीविषयी शिफारसी ही समिती करणार आहे.