
क्वाड (QUAD) समुदायाची पहिली शिखर परिषद
- अमेरिका, भारत, जपान आणि ऑस्ट्रेलिया या देशांचा समावेश असलेल्या क्वाड (QUAD – Quadrilateral Security Dialogue) म्हणजेच चतुर्भुज सुरक्षा संवाद गटाची पहिली बैठक २४ सप्टेंबर २०२१ रोजी व्हाईट हाऊसमध्ये पार पडली.
- या गटाच्या बैठकीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन आणि जपानचे पंतप्रधान योरीहिदे सुगा हे सहभागी झाले होते.
चर्चेतील विषय
- कोव्हिड – १९, सायबरस्पेस, हवामानबदल आणि हिंदी-पॅसिफिक क्षेत्रातील सुरक्षा इ.
क्वाडविषयी
- २००४-त्सुनामीनंतर मदत कार्यासाठी ही चार राष्ट्रे एकत्र आली. क्वाडच्या स्थापनेचे मूळ येथे आढळते.
- २००७-क्वाडची संकल्पना सर्वप्रथम शिंजो ॲबे यांनी अनौपचारिकपणे मांडली.
- २००७-आसियानच्या शिखर परिषदेपूर्वी पहिल्यांदा हा गट एकत्र भेटला.
- २०१७-फिलिपाइन्समधील मनिला येथे भरलेल्या आसियान शिखर परिषदेदरम्यान या चार देशांच्या प्रमुखांत QUAD पुनरुज्जीवित करण्यावर चर्चा झाली. त्यातूनच २०१७ मध्ये या गटाची स्थापना करण्यात आली.
- चीनचा इंडो-पॅसिफिक क्षेत्रावर वाढता प्रभाव रोखण्यासाठी या गटाची स्थापना झाल्याचे मानले जाते.
- चीनमधील धोरणात्मक गटाने QUAD ला आशियाई नाटो असे म्हटले आहे.
मलबार युद्धसराव
- QUAD गटाने २६ ऑगस्ट ते २९ ऑगस्ट २०२१ दरम्यान पॅसिफिक महासागरातील ग्वाम बेटाच्या किनारी मलबार हा नौदल युद्धसराव आयोजित केला होता.
- १९९२मध्ये भारत आणि अमेरिका या नौदलांदरम्यान हा युद्धसराव सुरू झाला.
- २०१५मध्ये जपानने त्यात कायमस्वरूपी सहभागी होण्याचा निर्णय घेतला. तर २०२०मध्ये त्यात ऑस्ट्रेलिया सहभागी झाला.