क्यू एस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये भारतातील ३ विद्यापीठे पहिल्या २०० मध्ये
- क्वाकारेली सायमंड्स या जागतिक शैक्षणिक विश्लेषण करणार्या संस्थेने १७वा वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. या ट्रॅकिंगमध्ये पहिल्या २०० मध्ये भारतातील केवळ ३ संस्था आहेत. आयआयटी बॉम्बे १७२ व्या स्थानी, आयआय एससी बंगळुरू १८४ व्या स्थानी, आयआयटी दिल्ली १९३ व्या स्थानी आहे.
- अमेरिकेतील मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पहिल्या स्थानी, स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटी दुसर्या तर हार्वर्ड तिसर्या स्थानी आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठ पाचव्या स्थानी आहे.
- क्यूएस ही संस्था पुढील घटकांचा विद्यापीठ मानांकांसाठी विचार करते. शैक्षणिक प्रतिष्ठा या घटकाला ४० टक्के, एम्प्लॉयर प्रतिष्ठा या घटकाला १० टक्के, प्रत्येक शैक्षणिक वर्गातील प्रशस्तिपत्रे या घटकाला २० टक्के, शिक्षक-विद्यार्थी गुणोत्तर या घटकाला २०टक्के, आंतरराष्ट्रीय शिक्षक आणि आंतरराष्ट्रीय विद्यार्थी गुणोत्तर या घटकाला ५ टक्के वेटेज देण्यात येते.