‘क्यूबा’ दहशतवादाला प्रोत्साहन देणारा देश
-
- आंतरराष्ट्रीय दहशतवादाच्या कृतींना वारंवार पाठिंबा देण्यासाठी प्रशासनाने क्यूबाला पुन्हा एकदा दहशतवादास प्रोत्साहन देणारा देश म्हणून जाहीर केले आहे.
- अमेरिका व क्यूबा या देशांतील राजनैतिक संबंध पुनःस्स्थापित व्हावे म्हणून २०१५ मध्ये तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी क्यूबाला देशाच्या यादीतून बाहेर काढले होते.
- प्रशासनाचे क्यूबासंबंधित धोरण :
-
- ट्रम्प प्रशासनाने हवाना वगळता इतर क्यूबातील शहरांत जाणाऱ्या अमेरिकन फ्लाईट्सवर बंदी घातली आहे.
- तसेच US क्रूझ शिप्स आणि नौकांनादेखील क्यूबाला जाण्यास बंदी घातली.
- कारणे :
-
- क्यूबामधील सरकारचा लोकांवरील दडपशाही
- व्हेनेझुएलासह इतर काही देशांतील वाढता हस्तक्षेप
- इतर देशांतील दहशतवादी कारवायांना दिलेला सततचा पाठिंबा
- काय आहे अमेरिकेची दहशतवादास प्रोत्साहन देणाऱ्या देशांची यादी
-
- अमेरिकेचे परराष्ट्र सचिव आंतरराष्ट्रीय दहशतवादाच्या कृतींना वारंवार पाठिंबा देणाऱ्या देशांना दहशतवादास प्रोत्साहन देणारा देश म्हणून घोषित करतात.
- या यादीच्या काही भागावर अमेरिका खालील चार प्रकारचे निर्बंध घालू शकतो.
अ) अमेरिकेची परकीय मदत
ब) संरक्षण निर्यातीवर आणि विक्रीवर बंदी
क) दुहेरी उपभोग वस्तूंच्या निर्यातीवर काही विशिष्ट नियंत्रणे
ड) संकीर्ण आर्थिक आणि इतर निबंध
- सध्या या यादीत समाविष्ट असलेले देश :
अ) सीरिया (१९७९)
ब) इराण (१९८४)
क) उत्तर कोरिया (२०१७)
ड) क्यूबा (२०२१)
- नुकताच ऑक्टोबर, २०२० मध्ये सुदानला या यादीतून बाहेर काढण्यात आले आहे.