क्यूएस जागतिक विद्यापीठ क्रमवारी : २०२२

क्यूएस जागतिक विद्यापीठ क्रमवारी : २०२२

 • जगातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठांची क्रमवारी
 • जाहीर करणारी संस्था : क्वेकरली सायमंडस (QS) (ब्रिटिश कंपनी)
 • सुरुवात : २००४ मध्ये ‘THE’ या संस्थेच्या भागीदारीने (२०१०पासून QS व THE या दोन्ही संस्था स्वत:ची वेगवेगळी क्रमवारी जाहीर करतात).
 • आवृत्ती : १८वी

ही क्रमवारी काढण्यासाठी वापरण्यात येणारे निकष :

१) शैक्षणिक प्रतिष्ठा

२) नियोक्ता प्रतिष्ठा

३) प्राध्यापक – विद्यार्थी प्रमाण

४) प्रति प्राध्यापक उद्धरणे. (Citations)

५) प्राध्यापकांचे आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रमाण

६) विद्यार्थ्यांचे आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रमाण

जगातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठ:

 • आंतरराष्ट्रीय रँकिंग एक्स्पर्ट ग्रुपची (IREG) मान्यता मिळालेली एकमेव आंतरराष्ट्रीय क्रमवारी
 • या क्रमवारीत जगातील सर्वोत्कृष्ट १३०० विद्यापीठांचा समावेश आहे.
 • भारतातील एकूण २२ विद्यापीठांचा समावेश आहे.
 • मॅसॅच्युसेट्‌स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (MIT) या विद्यापीठाने सलग दहाव्यांदा सर्वोत्तम विद्यापीठ होण्याचा मान मिळवला आहे.

या क्रमवारीनुसार जगातील ५ सर्वोत्कृष्ट विद्यापीठे :

विद्यापीठ देश क्रमवारी
२०२० २०२१ २०२२
MIT अमेरिका
ऑक्सफर्ड विद्यापीठ युनायटेड किंग्डम
स्टॅनफोर्ड विद्यापीठ अमेरिका
कॅम्ब्रिज विद्यापीठ युनायटेड किंग्डम
कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अमेरिका

आशियातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठे :

२०२२ च्या क्रमवारीनुसार टॉप २० मध्ये आशियातील ४ विद्यापीठांचा समावेश –

अ) सिंगापूर नॅशनल युनिव्हर्सिटी (११)

ब) नानयांग टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी, सिंगापूर (१२)

क) त्सिंघुआ युनिव्हर्सिटी, चीन (१७)

ड) पेकिंग युनिव्हर्सिटी, चीन (१८)

भारतातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठे :

 • IIT मुंबई, IIT दिल्ली व IISC बंगळूरू यांनी सलग ५ व्या वर्षी जगातील सर्वोत्तम २०० विद्यापीठांच्या यादीत स्थान मिळवले.
 • संशोधनाबाबत भारतीय विज्ञान संस्था (IISC), बंगळूरू जगात सर्वोत्कृष्ट
 • या क्रमवारीमधील विद्यापीठांचे स्थान:

अ) दिल्ली विद्यापीठ : ५०१ – ५१०

ब) जवाहरलाल नेहरू विद्यापीठ : ५६१ – ५७०

क) सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठ : ५९१ – ६००

ड) जाधवपूर व हैदराबाद विद्यापीठ : ६५१ – ७००

इ) मुंबई विद्यापीठ : १००१ – १२००

भारतातील संस्थांची क्रमवारी

संस्था २०२० २०२१ २०२२
IIT मुंबई १५२ १७२ १७७
IIT दिल्ली १८२ १९३ १८५
IISc बंगळूरू १८४ १८५ १८६
IIT मद्रास २७१ २७५ २५५
IIT कानपूर २९१ ३५० २७७
IIT खरगपूर २८१ ३१४ २८०
IIT गुवाहाटी ४९१ ४७० ३९६
IIT रुरकी ३८३ ३८३ ४००

Contact Us

  Enquire Now