कोव्हॅक्सिन व कोव्हिशील्ड या दोन लसींचा एकत्रित डोस अधिक परिणामकारक
- कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशील्ड या दोन लसींचा एकत्रित कॉकटेल डोस अधिक परिणामकारक व प्रभावी आहे असा निष्कर्ष ‘आयसीएमआर’ने काढला आहे.
- उत्तर प्रदेशमध्ये १८ व्यक्तींना चुकून दोन वेगवेगळ्या लसींच्या मात्रा देण्यात आल्या होत्या.
- त्यावरून असा निष्कर्ष काढण्यात आला की संमिश्र लस घेतलेल्यामध्ये अल्फा, बिटा आणि डेल्टा विषाणूंविरोधात अधिक प्रभावी आढळले.
- या दोन लसींच्या एकत्रित कॉकटेल डोसमुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती अधिक सुधारते असे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) अभ्यासातून स्पष्ट झाले आहे.
- दोन्ही डोस घेतले असतील तर कोरोनामुळे मृत्यूचा धोका ९५ टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो यापूर्वी आयसीएमआरने सांगितले होते.
- पण केंद्र सरकारने यापूर्वी दोन्ही लसींचे एकत्रित डोस घेऊ नये असा इशारा दिला होता, पण आयसीएमआरच्या अभ्यासावरून दोन लसींचे ‘मिक्सिंग ॲण्ड मॅचिंग’ अधिक प्रभावी आहे असे सांगण्यात येत आहे.
- त्यामुळे दोन वेगवेगळ्या लसींचे डोस घेणे अधिक सुरक्षित असल्याचेही आयसीएमआरने सांगितले आहे.
कोव्हिशील्ड
- ही लस ऑक्सफर्ड ॲस्ट्राझेनेकाने तयार केली आहे.
- पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये उत्पादन सुरू आहे.
- बी – ११७ आणि बी – १३५१ या व्हेरियंटवर प्रभावी असल्याचे दिसून आले आहे.
कोव्हॅक्सीन
- ही स्वदेशी लस आहे.
- भारत बायोटेकने या लसीची निर्मिती केली आहे.
- बी ११७ या व्हेरियंटसह अन्य व्हेरियंटवर प्रभावी असल्याचा दावा आहे.