कोविड-१९ उपचारासाठी भारतातील पहिली प्लास्मा बँक सुरू
- २९ जून २०२० रोजी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी कोविड-१९ रुग्णांसाठी ही योजना सुरू केली.
प्लाझ्मा सुविधा :
१. ‘यकृत व पित्तविषयक संस्था’ या ठिकाणी ही सुविधा उपलब्ध असेल. (सरकारी व खासगी रुग्णालयांकरिता)
२. ही सुविधा २ जुलै २०२० रोजी कार्यान्वित होईल.
प्लाझ्मा उपचार :
१. ही कोविड-१९ रुग्णांवर उपचार करण्याची सर्वाधिक चर्चेतील पद्धत आहे.
२. या उपचारानंतरांतर्गत दिल्ली सरकारने २९ पेक्षा अधिक रुग्णांवर वैद्यकीय चाचण्या केल्या. ज्यात त्यांनी उत्कृष्ट प्रतिसाद दिला व त्यांच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम दिसला. (चाचणीची सुरुवात – एप्रिल २०२०, दिल्ली)
३. या उपचारादरम्यान कोविड-१९ पासून बर्या झालेल्या व्यक्तीचा प्लाझ्मा कोविड-१९ गंभीर रुग्णांच्या शरीरात संक्रमित केला जातो.