कोविडविरोधात प्रभावशाली उपाययोजनांबाबत वर्धा जिल्ह्याचा गौरव
- कोविड विरोधात प्रभावी उपाययोजनांबद्दल वर्धा जिल्ह्याला स्कॉच या संस्थेद्वारे राष्ट्रीय पातळीचा ‘स्कॉच अॅवॉर्ड’ देण्यात आले आहे.
- सर्वत्र कोरोनाचे रुग्ण सापडत असतांना वर्धा जिल्ह्याने सुरुवातीचे ५० दिवस कोरोनाला जिल्ह्यात दाखल होऊ दिले नाही.
- स्कॉच पुरस्काराच्या स्पर्धेत सहभागी झाल्यावर ऑनलाईन बैठकीत वर्धा जिल्ह्यात काय प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या याची माहिती देण्यात आली. पीपीटीद्वारे अंतिम फेरीत उत्कृष्टपणे सादरीकरण केल्यानंतर वर्धा जिल्ह्याला हा पुरस्कार जाहीर करण्यात आला.