कोल्हापूरी चपलांच्या निर्मितीसाठी आता कारागिरांना प्रशिक्षण
- पादत्राणे रचना व विकास संस्थेने (FDDI) कारागिरांना कोल्हापुरी चपला बनवण्याचे प्रशिक्षण देण्याचे ठरवले असून त्यांना ग्राहक मिळवून देण्यासाठी मदत केली जाणार आहे.
- त्यामुळे देशांतर्गत आणि जागतिक बाजारपेठेतही कोल्हापुरी चपलेचा बाज आता झळकणार आहे.
- FDII संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक अरुणकुमार सिन्हा यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील महिन्यापासून कोल्हापुरी चपला तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
- कोल्हापुरी चपलांची रचना, रंग यात बदल करण्यात येणार असून त्यामुळे विक्री वाढणार आहे.
- कोल्हापुरी चपलांची विक्री व व्यापार वाढवण्यसाठी सरकाने या चपलांना भौगेालिक ओळख म्हणजेच ‘जीआय’ टॅग दिला आहे.
- भौगोलिक ओळख म्हणजे जी आय दर्जा कृषी, नैसर्गिक व उत्पादित वस्तूंना दिला जातो. त्यात हस्तकला व औद्योगिक वस्तूंचाही समावेश आहे.
- जीआय दर्जामुळे या चपलांना आंतरराष्ट्रीय मान्यता मिळणार आहे.
- एकदा जीआय दर्जा दिल्यानंतर ती वस्तू त्याच नावाने पुन्हा कुणी विकू शकत नाही.
- या चपला हाताने तयार केलेल्या व जास्त मजबूत असतात.
- कोल्हापुरी चपलांचे उत्पादन महाराष्ट्रातील सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा तर कर्नाटकातील बेळगावी, धारवाड, बागलकोट, विजापूर या जिल्ह्यांत केले जाते.
- युरोप, अमेरिका व ऑस्ट्रेलियात या चपलांना मोठी मागणी आहे. मात्र त्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होत नाही. त्यामुळे उत्पादन व दर्जा या दोन्हींचा मेळ साधता आला पाहिजे.
कोल्हापुरी चपलांची निर्यात :
- वर्ष 2021-22 (एप्रिल ते ऑगस्ट) उत्पन्न रु. 68.5 लाख
- 2019-20 – उत्पन्न रु. 1.74 कोटी
निर्यात होणारे प्रमुख देश :
- ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, कोरिया, मलेशिया, नेपाळ, मॉरिशस, सिंगापूर, दक्षिण आफ्रिका
जीआय दर्जा :
फुटवेअर डिझाईन ॲण्ड डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट (FDDI) बद्दल :
- स्थापना : 1986
- व्यवस्थापकीय संचालक : अरुण कुमार सिन्हा (IAS)
- मुख्यालय – नोएडा, उत्तरप्रदेश