कोलकाता बंदराचे नामकरण श्यामाप्रसाद मुखर्जी बंदर

कोलकाता बंदराचे नामकरण श्यामाप्रसाद मुखर्जी बंदर

 • केंद्रीय मंत्रिमंडळाने याबाबत ३ जून २०२० रोजी मान्यता दिली आहे.
 • कोलकाता पोर्ट ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाने फेब्रुवारी २०२० मध्येच याबाबतचा ठराव मंजूर केला होता.

कोलकाता बंदर

 • हे बंदर भारतातील पहिले मोठे बंदर तसेच देशातील एकमेव नदीवरील बंदर आहे. (२०२० मध्ये या बंदरास १५० वर्षे पूर्ण)
 • भारतात एकूण १२ मुख्य बंदरे आहेत. (५ फेब्रुवारी २०२० मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने वाढवण (डहाणू, पालघर) येथे १३ व्या मुख्य बंदर उभारणीस मान्यता दिली.)
 • भारतीय बंदरे कायदा, १९०८ च्या परिशिष्ट १ मधील क्रमांक १ चे हे बंदर आहे.
 • या बंदराचे व्यवस्थापन मुख्य बंदरे विश्वस्त कायदा, १९६३ (Major port trusts act, १९६३) नुसार केले जाते.

देशातील मोठी बंदरे आणि नामकरण

 • २०२० – कोलकत्ता बंदर – श्यामाप्रसाद मुखर्जी बंदर
 • २०१७ – कांडला बंदर – दीनदयाळ उपाध्याय बंदर
 • २०१४ – एन्नोर बंदर – कामराजार (Kamarajar) बंदर
 • १९८९ – न्हावा – शेवा बंदर – जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट (JNPT)

भारतातील मुख्य बंदरे (१३)

१. श्यामाप्रसाद मुखर्जी बंदर – पश्चिम बंगाल

२. विशाखापट्टनम् बंदर – आंध्रप्रदेश

३. दीनदयाळ उपाध्याय (कांडला बंदर) – गुजरात

४. जेएनपीटी – महाराष्ट्र

५. पारादीप बंदर – ओदिशा

६. कामराजार बंदर – तमिळनाडू

७. मार्मुगोवा बंदर – गोवा

८. कोचीन बंदर – केरळ

९. नवीन मँगलोर बंदर – मँगलोर

१०. चेन्नई बंदर – तमिळनाडू

११. चिदंबरनार बंदर – तुतिकोरीन

१२. मुंबई बंदर – मुंबई, महाराष्ट्र

१३. वाढवण – डहाणू, पालघर

श्यामाप्रसाद मुखर्जी आणि बंगाल :

 • जन्म – ६ जुलै १९०१ – कोलकाता
 • वडील – आशुतोष मुखर्जी – (सँडलर आयोग – १९१७ च्या दोन भारतीय सदस्यांपैकी एक)
 • १९४७ ला नेहरुंच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळात ‘उद्योग व पुरवठामंत्री’
 • भारतीय जन संघाची १९५१ मध्ये स्थापना
 • १९४३ ते १९४६ दरम्यान आखिल भारतीय हिंदू महासभेचे अध्यक्ष
 • १९५३ मध्ये हृदयविकाराच्या धक्क्याने जम्मू आणि काश्मिरमधील तुरुंगात मृत्यू

Contact Us

  Enquire Now