कोरोना काळात अनाथ झालेल्या बालकांसाठी टास्क फोर्सची स्थापना

कोरोना काळात अनाथ झालेल्या बालकांसाठी टास्क फोर्सची स्थापना

 • कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे संगोपन या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यासाठी प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली कृती दल (टास्क फोर्स) गठित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
 • अनाथ बालकांना त्याचे न्याय्य हक्क मिळवून देणे व त्यांचे संरक्षण, शिक्षण व इतर अनुशंगिक समस्या सोडविण्यासाठी कृती दलाची स्थापना.
 • अनाथ झालेले बालक शोषणास बळी पडण्याचे तसेच बाल कामगार किंवा मुलांची तस्करीसारख्या गुन्ह्यांना बळी पडण्याची जास्त शक्यता आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने टास्क फोर्स स्थापन करण्याचे निर्देश दिेले होते.
 • त्यामुळे महिला व बाल कल्याण विभागाने काढलेल्या आदेशानुसार टास्क फोर्स मध्ये संबंधित जिल्ह्याच्या महापालिकेचे आयुक्त, पोलिस आयुक्त, पोलिस अधीक्षक, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव, जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा आरोग्य अधिकारी इ. चा समावेश असेल.
 • जिल्हा समिती अधिकारी सदस्य, तर जिल्हा बाल संरक्षण अधिकारी समन्वयक म्हणून कार्य करणार.
 • टास्क फोर्सवर संपूर्ण नियंत्रण जिल्हाधिकाऱ्यांचे असेल. 
 • तसेच दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची माहिती समन्वयकांना उपलब्ध करून देण्याचे निर्देश देणे व पंधरा दिवसांतून एकदा टास्क फोर्सची बैठक आयोजित करणे.
 • चाईल्ड हेल्प लाईन क्र. 1098 चा माहिती फलक कार्यक्षेत्रातील प्रत्येक रुग्णालयात लावण्यात येईल.
 • समाज माध्यमांमध्ये चुकीचे संदेश पसरविणाऱ्यांवर कारवाई करण्याचे काम पोलिस आयुक्त / अधीक्षक (ग्रामीण) यांच्याकडून केले जाईल.

Contact Us

  Enquire Now