कोरोनाविरोधी लढण्यास आणखी दोन लसींना आपत्कालीन वापरास परवानगी
- ओमायक्रॉनच्या फैलावाबरोबरच रुग्णसंख्या वाढत असताना कोरोनाविरोधात लढण्यासाठी आणखी दोन लसींसह औषधाच्या आपत्कालीन वापरास परवानगी दिली आहे.
- केंद्रीय औषध महानियत्रंक कार्यालयाने कोव्हीव्हक्स आणि कोर्बिव्हॅक्स या दोन कोरोना प्रतिबंधक लशींना परवानगी.
- विषाणूविरोधी औषध मॉल्नूपिरावीरच्या आपत्कालीन वापरास परवानगी दिली आहे.
- सीरम इन्सिट्यूट ऑफ इंडिया आणि नोवाव्हॅक्स यांच्या संयुक्त भागीदारीतून कोव्हीव्हक्स आणि हैदराबादरचित बायोलॉजिकल-ई-या कंपनीने कोर्बिव्हॅक्स लशीची निर्मिती केली आहे.
- कोर्बिव्हॅक्स ही लस संपूर्ण भारतीय बनावटीची असून भारतात तयार झालेली कोरोना प्रतिबंधात्मक तिसरी लस ठरली आहे.
- मॉल्नुपिरावीर या औषधाचे उत्पादन देशातील १३ औषध उत्पादक कंपन्यांमार्फत करणार आहे.
- नोवाव्हॅक्स आणि सिरमच्या संयुक्त प्रयत्नातून तयार झालेल्या या लसीला नुकतेच जागतिक आरोग्य संघटनेसह इंडोनेशिया, फिलिपिन्स, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, न्यूझीलंड या देशांनी आपत्कालीन वापराला परवानगी दिली आहे.