कोरोनामुळे कासव महोत्सव रद्द
- रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात दरवर्षी कासव महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो, या मात्र यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे हा महोत्सव होणार नाही.
- मात्र पर्यावरण जाणिवा वाढल्यामुळे कासव संवर्धनाचे काम सुरूच राहणार आहे. कासवांची ७ हजार ७३१ इतकी अंडी सुरक्षित ठेवली आहेत.
- दापोली तालुका पर्यटनासाठी प्रसिद्ध असल्यामुळे दरवर्षी आंजर्ले कोळथेट येथे कासव महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. प्रसिद्ध वेळासचा कासव महोत्सवही यावर्षी रद्द करावा लागणार आहे.
- यावर्षी दापोली तालुक्यातील ७ व मंडणगडमधील १ अशा ८ समुद्रकिनाऱ्यांवर कासवांची घरटी संरक्षित करण्यात आली असून त्यात कासवाची ७ हजार ७३१ इतकी अंडी सुरक्षित ठेवण्यात आली आहेत.
- या अंड्यांमधून मार्च महिन्यात पिल्ले बाहेर येतील, असा अंदाज वनविभागाचे परिक्षेत्र वनाधिकारी वैभव बोराटे यांनी वर्तवला आहे.
- दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात मादी कासव अंडी घालण्यासाठी किनाऱ्यावर येतात. मात्र यंदा जून महिन्यात झालेल्या निसर्ग चक्रीवादळाचा परिणाम निसर्गावर झाल्याने यावर्षी हा हंगाम उशिरा सुरू झाला आहे.
- कासवमित्रांकडून संरक्षित घरट्यातून बाहेर आलेली कासवाची पिल्ले सूर्योदयापूर्वी व सूर्यास्ताच्या वेळी नियमितपणे समुद्राच्या दिशेने सोडण्यात येणार आहेत. वनविभागाद्वारे समुद्रकिनारी असलेल्या गावांमध्ये कासवमित्रांची नियुक्ती करण्यात आली आहे.