कोरोनामुक्त गाव योजना
1) लोकांमध्ये जनजागृती करतानाच कोरोनामुक्तीची चळवळ उभी राहावी यासाठी राज्यशासनाने कोरोनामुक्त गाव योजना सुरू केली.
2) या स्पर्धेत प्रत्येक महसूल विभागात चांगली कामगिरी करणाऱ्या पहिल्या तीन ग्रामपंचायतींना अनुक्रमे ५० लाख रुपये, २५ लाख रुपये व १५ लाख रुपये याप्रमाणे बक्षिस दिले जाणार आहे.
3) तसेच प्रत्येक महसूली विभागात प्रथम, द्वितीय, तृतीय येणाऱ्या गावांना अनुक्रमे १ कोटी रुपये, ५० लाख रुपये व ३० लाख रुपयांची भरघोस रक्कम गावाच्या विकासासाठी उपलब्ध होणार आहे.
4) या स्पर्धेत सहभागी गावाचे २२ निकषांवर ५० गुणांचे गुणांकन करण्यात येणार आहे.