कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे साहित्य संमेलनास स्थगिती
- २६ ते २८ मार्च या कालावधीत नाशिकमध्ये होणारे ९४वे आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोरोना आपत्तीमुळे पुन्हा एकदा स्थगित करण्यात आले.
- साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कौतुकराव ढाले-पाटील यांनी ही घोषणा केली.
- कोरोना आटोक्यात आल्यानंतर मे, २०२१पर्यंत नाशिकमध्ये संमेलन घेण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
- यासोबतच होणारे १५वे विद्रोही साहित्य संमेलनही रद्द करण्यात आले.
- डॉ. आनंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार होते.
आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
- १८७८ च्या मे महिन्यात न्या. रानडे यांनी लोकहितवादीच्या सहकार्याने ग्रंथकारांना एकत्र आणण्याचे ठरवले. असे आवाहन ‘ज्ञानप्रकाश’ मध्ये प्रसिद्ध केले.
- मे १८७८ रोजी संध्याकाळी पुण्याच्या हिराबागेत मराठी ग्रंथकारांनी संमेलन भरले. यालाच पहिले “अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन” समजले जाते.
- ९३वे साहित्य संमेलन – उस्मानाबाद – अध्यक्ष – फादर फ्रान्सिस दिब्रिटो
- ९४वे साहित्य संमेलन – नाशिक – अध्यक्ष जयंत नारळीकर